मुंबई- महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जेवढा वाचू तेवढा कमीच. या महापराक्रमी पुरुषाने रोवलेला स्वराज्याचा पाया आजही भक्कम आहे. आज ६ जून रोजी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आणखी एका शिवकालीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मागील काही वर्षात ' '', '', 'हिरकणी' यांसारख्या चित्रपटातून आपल्याला इतिहासाची नव्याने ओळख झाली. त्यापाठोपाठ 'सरसेनापती हंबीरराव मोहिते' हा चित्रपटही प्रदर्शनासाठी तयार आहे. आता '' चित्रपटातून प्रेक्षकांना आणखी एका ऐतिहासिक वीरांगनेची ओळख होणार आहे जिने स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिलं नाही. १८ व्या शतकातील छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडातील मराठा साम्राज्यातील एकमेव महिला सरसेनापती ठरलेल्या 'श्रीमंत सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे' यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'भद्रकाली' चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. खुल्या मैदानातील युद्ध आपल्या अफाट शौर्याने जिंकणाऱ्या या वीरांगनेचा इतिहास या चित्रपटातून उलगडणार आहे. मैदानावर शौर्य गाजवणाऱ्या उमाबाईंना 'भद्रकाली' हे नाव कसं पडलं याची कथा या चित्रपट दिसणार आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ब्लॉक बस्टर ठरलेला ‘मुळशी पॅटर्न’ व आगामी ‘जग्गु आणि Juliet’ या चित्रपटांचे निर्माते पुनीत बालन करत आहेत. सुपरहिट चित्रपट ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि आगामी ‘पावनखिंड’ या सिनेमांचे लेखक हे 'भद्रकाली' चे लेखक आहेत. तसेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या ‘कच्चा लिंबू’ आणि सुपरहिट ‘हिरकणी’ सारख्या चित्रपटांचे तसेच आगामी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे ‘यशस्वी’ दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तर संगीतातील जादूगार अजय-अतुल यांच्या उत्कृष्ट गाण्यांची चित्रपटाला साथ असणार आहे. या सगळ्या दिग्गज कलाकारांच्या मेहनतीने तयार होणारा 'भद्रकाली' प्रेक्षकांना पुन्हा इतिहासात घेऊन जाणार हे नक्की.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g19Lwl