नवी दिल्लीः टेक कंपनी GOQii ने करोना संसर्ग काळात मुलांच्या सुरक्षेसाठी एक खास GOQii Smart Vital Junior फिटनेस बँडला भारतात लाँच केले आहे. ही फिटनेस बँड हार्ट रेट आणि ऑक्सिजन लेवलला मॉनिटर करण्यात सक्षम आहे. तसेच या फिटनेस बँड मध्ये १८ स्पोर्ट मोड आणि स्लीप ट्रॅकिंग सारखे लेटेस्ट फीचर्स दिले आहेत. वाचाः GOQii Smart Vital Junior चे खास फीचर्स GOQii Smart Vital Junior फिटनेस बँड मध्ये 33mm चा कलर डिस्प्ले दिला आहे. या फिटनेस बँड मध्ये हार्ट रेट मॉनिटर आणि SPo2 सेन्सर दिला आहे. हा ब्लड मध्ये ऑक्सिजन लेवलला ट्रॅक करतो. याशिवाय, या फिटनेस बँड मध्ये बॉडी टेम्परेचर मोजण्याची सुविधा दिली आहे. वाचाः १८ स्पोर्ट मोड मिळणार कंपनी ने GOQii Smart Vital Junior स्मार्ट बँड मध्ये १८ स्पोर्ट मोड दिले आहेत. ज्यात वॉकिंग रनिंग आणि योगा सारख्या अॅक्टिवेटचा समावेश आहे. यासोबतच फिटनेस बँड मध्ये स्लीप ट्रॅकिंग सह फाइंड माय फोन, अलार्म आणि कॉल मेसेज नोटिफिकेशन सारखे लेटेस्ट फीचर्स दिले आहेत. GOQii ने आपल्या स्मार्ट बँड मध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी खास सुविधा दिली आहे. आई आणि वडील GOQii मोबाइलच्या द्वारे आपल्या मुलांच्या आरोग्यावर नजर ठेऊ शकतात. GOQii Smart Vital Juniorची किंमत GOQii Smart Vital Junior फिटनेस बँडची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. या फिटनेस बँडला कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकते. या स्मार्टवॉचशी टक्कर होणार GOQii Smart Vital Junior फिटनेस बँडला भारतीय बाजारात Noise Colorfit Pro 3 शी जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या स्मार्टवॉचची किंमत ४ हजार ४४९ रुपये आहे. या स्मार्टवॉच मध्ये १.५५ इंचाचा टच एचडी TruView डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 320*360 पिक्सल आहे. या स्मार्टवॉच मध्ये क्लाउड बेस्ड वॉच फेस दिले आहे. यासोबतच या वॉचमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uOlFOd