नवी दिल्ली : ने चीनमध्ये आपला नवीन बजेट Nokia C20 Plus लाँच केला आहे. हा फोन कंपनीचा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन चे अपग्रेडेट व्हर्जन आहे. नोकिया सी२० एप्रिलमध्ये जागतिक बाजारात लाँच झाला होता. नोकिया सी२० प्लसमध्ये मोठी बॅटरी आणि अँड्राइड ११ गो सारखे फीचर्स आहेत. सोबतच नोकियाने BH-२०५ TWS आणि SP-१०१ पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर देखील सादर केले आहेत. वाचाः Nokia C20 Plus: किंमत आणि उपलब्धता नोकिया सी२० प्लसची किंमत ६९९ युआन (जवळपास ८ हजार रुपये) आहे. हँडसेटची विक्री चीनमध्ये १६ जूनपासून सुरू होईल. फोन ओशन ब्लू आणि ग्रेफाइट ब्लॅक रंगात येतो. तर बीएच-२०५ ब्लूटूथ हेडसेट आणि एसपी-१०१ ब्लूटूथ स्पीकरची किंमत १९९ युआन (जवळपास २३०० रुपये) आहे. हे प्रोडक्ट्स इतर बाजारात कधी लाँच होतील याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. वाचाः Nokia C20 Plus: स्पेसिफिकेशन्स नोकिया सी२० प्लसमध्ये पॉलिकार्बोनेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन ६.५ इंच एचडी+ डिस्प्लेसह येतो, ज्याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि रियरला ८ मेगापिक्सल प्रायमरी व २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळेळ. फोनमध्ये ऑक्टो-कोर Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. हा फोन अँड्राइड ११ गो वर चालतो. यात पॉवरसाठी १० वॉट चार्जर सपोर्टसह येणारी ४९५० mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेले नाही, मात्र फेस अनलॉक सपोर्ट मिळेल. फोनमध्ये ड्यूल सिम, ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ४.२, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. हेडसेट नॅचरल नॉर्डिक डिझाइनसोबत येतो. यात मोठ्या आकाराचे डायमॅनिक ड्राइव्हर्स ब्लूटूथ ५.०, ४६ तास टिकणारी बॅटरी लाइफ आणि टच कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. हेडसेट पोलर ब्लू आणि चारकोल ब्लॅक रंगात येतो. SP-१०१ पोर्टेबल वायरलेस ब्लूटूथू स्पीकर एक कॉम्पॅक्ट डिव्हाइस आहे. याचे वजन केवळ १६० ग्रॅम आहे आणि यात डायनमिक वॉल्यूम, २० तासांची बॅटरी लाइफ, मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट, बिल्ट-इन मायक्रोफोन आणि हँड्स-फ्री कॉल सारखे फीचर्स मिळतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gneQhq