Full Width(True/False)

एका किसमुळे कायली जेनर झाली अब्जाधीश, कमेंटनं पलटवलं नशीब

मुंबई: कधी- कधी एखाद्या व्यक्तीची एक कमेंट किंवा छोटीशी टीपणी तुमचं आयुष्य बदलवू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध मॉडेल कायली जेनर. आज अमेरिकेतील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व, मॉडेल आणि उद्योजिका आहे. कायलीचा समावेश आज जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत होतो. अब्जावधीच्या बिझनेसची ती मालकीण आहे. पण हे सर्व फक्त तिच्या बॉयफ्रेंडमुळे झालं आहे. जाणून घेऊयात कायलीची अब्जाधीश होण्यामागची संपूर्ण कहाणी... आज अब्जाधीश असलेल्या कायली जेनरनं वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी लिप किट नावची कॉस्मेटिक लाइन सुरू केली होती. पण नंतर ती प्रचंड लोकप्रिय झाली आणि मग कायलीनं तिचं नाव बदलून कायली कॉस्मॅटिक्स केलं. याच बिझनेसमधून कायली आज अब्जावधीची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योजिका झाली आहे. कायली जेनर आज २३ वर्षांची आहे. टीव्ही शो 'किपिंग अप विथ द कार्दशियन्स'मध्ये कायलीनं तिच्या बिझनेस आणि यशस्वीतेचा प्रवास कसा झाला हे स्पष्ट केलं. 'जेव्हा ओठांमुळे आत्मविश्वास कमी होऊ लागला तेव्हा मी मेकअप करायला सुरूवात केली' असं कायली सांगते. कारण तिच्या मते तिचे ओठ अजिबात चांगले किंवा परफेक्ट ओठांच्या व्याख्येत बसणारे नव्हते. कायलीनं यावेळी बॉयफ्रेंडसोबतचा तिचा एक किस्सा शेअर केला. जेव्हा कायलीला तिच्या बॉयफ्रेंडनं किस केलं होतं तेव्हा तो म्हणाला, 'तू एक चांगली किसर आहेस पण तुझे ओठ खूपच लहान आहेत.' यानंतर कायलीला आपण किस करण्याच्या योग्यतेचे नाही असं वाटू लागलं. त्यानंतर तिनं आपल्या ओठांवर फिलर्सचा वापर करणं सुरू केलं. बॉयफ्रेंडच्या त्या एका कमेंटनं कायलीला प्रेरणा दिली आणि मग तिनं स्वतःची कॉस्मेटिक लाइन सुरू केली होती. कायली जेनर तिच्या बहिणींप्रमाणेच सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. कायलीच्या प्रसिद्धीचा अंदाज तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सवरून लावता येतो. इन्स्टाग्रामवर कायलीचे २४ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. कायली तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःच्या कॉस्मेटिक्स प्रोडक्टसोबतच स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xGFjNZ