मुंबई : सध्या तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहांच्या लग्नावरून जोरदार चर्चा सुरू आहे. नुसरतने २०१९ मध्ये उद्योगपती शी लग्न केले होते. या दोघांचे लग्न हे त्या वर्षीतील सर्वाधिक चर्चीत सोहळा ठरला होता. तुर्कीमध्ये अत्यंत दिमाखदार पद्धतीने झालेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. लग्नानंतर सिंदूर, लाल साडी आणि हातामध्ये नव वधूचा चुडा घातलेली नुसरत संसदेमध्ये पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. केवळ इतकेच नाही तर मुसलमान असूनही हिंदू पद्धतीने साजशृंगार केल्यावरून तिच्याविरोधात फतवे काढले होते. आता याच नुसरतने तिला हे लग्नच मान्य नसल्याचे जाहीर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. निखिल जैनशी लग्न करून दोन वर्षांनंतर नुसरतने आपले लग्न कसे अवैध आहे, याचे खुलासे केले आहेत. इतकेच नाही तर दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. रोजच्या रोज हे एकमेकांवर आरोप करत आहेत. कोण आहे निखिल जैन निखिल जैन हा अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहांचा नवरा आहे, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. निखिल हा कोलकातामधील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. निखिलचे वडील ख्यातनाम उद्योजक आहेत तर त्याची आई गृहिणी आहे. निखिलला किर्ती आणि स्वाती या दोघी बहिणी आहेत. निखिलचे वडील मोहन कुमार जैन यांची 'रंगोली' नावाची एक मोठी टेक्स्टाइल कंपनी आहे. त्यांचाच व्यवसाय निखिल आता सांभाळत आहे. निखिलचा हा व्यवसाय कोलकात्यासोबतच हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, विजयवाडा येथे विस्तारलेला आहे. कोलकात्यामध्ये सर्वात जास्त बिझनेस आहे. कोलकात्यामधील उद्योग विश्वात त्यांचे मानाचे स्थान आहे. निखिलचा जन्म कोलकाता येथेच झाले. येथेच त्यांचे संपूर्ण शिक्षणही झाले. त्यानंतर निखिलने युकेमधील वार्विक युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेन्टची पदवी घेतली. मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असल्याने निखिलचे शौकही विलासी आहेत. त्याला गाड्यांची प्रचंड आवड असल्याने त्याच्या ताफ्यात अतिशय महागड्या गाड्या आहेत. त्यामध्ये एस्टन मार्टिन ही त्याची आवडती गाडी आहे. अशी झाली नुसरतची भेट आणि निखिल यांची भेट २०१८ मध्ये दुर्गा पूजेच्या उत्सवावेळी झाली. तेव्हापासूनच त्या दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेम फुलायला सुरुवात झाली. त्यानंतर नुसरत निखिलच्या रंगोली ब्रँडची अँबेसिडर आणि मॉडेल झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तुर्कीमध्ये जाऊन शाही विवाह सोहळ्यामध्ये एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या. यावेळी दोघांचे कुटुंब, मित्र- परिवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी कोलकातामध्ये रिसेप्शनही ठेवले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः येऊन या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2U2xqnq