नवी दिल्लीः टेक कंपनी रियलमी आपली प्रसिद्ध सी सीरीजचा नवा स्मार्टफोन ला लवकरच लाँच करू शकते. कंपनी या फोनला व्हिएतनाम मध्ये लाँच करण्याची तयारी करीत आहे. एका टिप्स्टरच्या माहितीनुसार, व्हिएतनाममध्ये हा अपकमिंग स्मार्टफोन एका ऑनलाइन रिटेलरच्या साइटवर लिस्ट झाला आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे फीचर्स लीक झाले आहेत. वाचाः टिप्स्टरच्या माहितीनुसार, हा रियलमीचा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात अँड्रॉयड गो एडिशन सोबत येईल. हा फोन व्हिएतनामच्या एका वेबसाइट thegioididong.com लिस्ट आहे. टिप्स्टरने याच लिस्टिंगला शेअर केले आहे. या लिस्टिंगमध्ये फोन दोन कलर ऑप्शन ब्लॅक आणि ब्लू मध्ये दिसत आहे. फोनची किंमत किती असेल यासंबंधी वेबसाइटवर अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः रियलमी C21 Y चे फीचर्स लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनमध्ये 720x1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस ४२१ निट्स आहे. हे 60Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले जाणार आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून ऑक्टा-कोर UniSoc T610 SoC दिले आहे. फोनला ड्युअल नॅनो सिम सपोर्ट सोबत आणले जाणार आहे. या फोनमद्ये कंपनी अँड्रॉयड ११ गो एडिशन ऑफर करू शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा ऑफर करीत आहे. रियल फिंगरप्रिंट स्कॅनरच्या या फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १० वॉटचा चार्जिंग सपोर्ट सोबत येतो. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G, वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्लूटूथ वर्जन 5, 3.5mm हेडफोन जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cv7fMD