नवी दिल्लीः Covid-19 च्या लसीची कमतरता संपूर्ण देशात आहे. यामुळे लस मिळवण्यास उशीर होत आहे. लस स्लॉट बुक करण्यासाठी तुम्हाला कोविन प्लॅटफॉर्मवर जावे लागते. परंतु, आता येथेही स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी बसले आहेत. स्कॅमर्स याच्या आडून अँड्रॉयड मेलवेयर पसरवत आहेत. वाचाः लोकांना एक एसएमएस पाठवला जातो. त्यात फ्री करोना लस स्लॉट बुक करण्याचे सांगितले जाते. एसएमएस सोबत एक लिंक सुद्धा दिली जाते. अँड्रॉयड मेलवेयरचा असतो. ज्यावेळी कोणताही व्यक्ती या लिंकवर क्लिक करतो. त्यावेळी त्याच्या फोनमध्ये एक मेलवेयर इन्स्टॉल केला जातो. हे मेलवेयर यूजरच्या फोनमध्ये कॉन्टॅक्ट, एसएमएस सोबत दुसऱ्या डिटेल्स सोबत अॅक्सेस मागते. सायबर सिक्योरिटी फर्म ESET Lukas Stefanko च्या माहितीनुसार, मेलवेयर रिसर्चरने सांगितले की, या वर्षी एप्रिल मध्ये हे सुरू झाले होते. तसेच ते अजूनही अॅक्टिव आहेत. वाचाः मेलवेयरला Covid-19 vaccine, Covid-19 vaccine registration, Vaccine Register, My-Vaci यासारखे अनेक नाव दिले आहेत. नुकतेच Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ने सुद्धा फेक CoWIN व्हॅक्सीन रजिस्ट्रेशन अॅप जो SMS वरून पसरवला जात आहे, त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. CERT-In ने सांगितले की, SMS वरून जो फेक मेसेज पसरवला जात आहे तो COVID-19 व्हॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन करायला लावणे म्हणजे चुकीचा दावा आहे. तुम्हाला वेगवेगळ्या एसएमएस करून अॅप डाउनलोड करायचा सांगितले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cex1Vi