Full Width(True/False)

'या' तारखेला भारतात लाँच होणार Mi 11 Lite स्मार्टफोन, व्हेरिएंटचा झाला खुलासा

नवी दिल्ली : चा नवीन Mi 11 Lite २२ जूनला भारतात लाँच होणार आहे. अधिकृत लाँचिंगच्या आधी कंपनीने या डिव्हाइसच्या कलर व्हेरिएंटचा खुलासा केला आहे. हा फोन Tuscany Coral, Jazz Blue आणि Vinyl Black कलर पर्यायासह बाजारात उपलब्ध होईल. या डिव्हाइसच्या अधिकृत किंमतीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाचाः Mi 11 Lite ची संभाव्य किंमत कंपनीने काही दिवसांपूर्वी स्मार्टफोनला यूरोपमध्ये लाँच केले होते. यूरोपमध्ये फोनची किंमत २९९ यूरो (जवळपास २५ हजार रुपये) आहे. भारतात देखील फोन २० ते २५ हजार रुपये किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Mi 11 Lite चे स्पेसिफिकेशन Mi 11 Lite स्मार्टफोन ४जी आणि ५जी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंचाचा फूल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट ९०हर्ट्ज असेल. सोबतच यात क्वालकॉम Snapdragon ७३२G प्रोसेसर, ८GB रॅम आणि १२८GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. डिव्हाइस अँड्राइड ११ वर काम करेल. वाचाः कॅमेरा Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसोबत येईल. यात पहिला कॅमेरा ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तिसरा ५ मेगापिक्सल टेलिफोटो मॅक्रो लेंस असेल. अन्य फीचर्स Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये ४,२५० एमएएचची बॅटरी मिळेल, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. या व्यतिरिक्त कनेक्टिव्हिटी वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SEFIlc