नवी दिल्ली : कंपनी लवकरच भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी या फोनला उद्या (८ जून) लाँच करेल. मात्र, अधिकृत लाँचिंगच्या अधिकच फोनच्या किंमत आणि फीचर्सबाबत अनेक माहिती समोर आली आहे. फोन शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरीसोबत येईल. यासोबतच यात हँडसेट मीडियाटेक डाइमेंशन ७०० चिप मिळेल. वाचाः सर्वात स्वस्त ५जी फोन एका टिपस्टरनुसार ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या POCO M3 Pro 5G ची किंमत जवळपास १७,९९९ रुपये (($२४६) असू शकते. हा भारतातील सर्वात स्वस्त ५जी फोन असेल. कंपनी स्मार्टफोनला यापेक्षा कमी किंमतीत देखील लाँच करू शकते. जे ४ जीबी रॅम आमि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट असू शकते. POCO M3 Pro 5G ची किंमत भारतीय बाजारातील लाँचिंगच्या आधी POCO M3 Pro ला युरोपमध्ये १७९ युरो (१५,८४८ रुपये) सुरुवाती किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या किंमतीवरून अंदाज लावला जात आहे की, भारतात या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास १५ हजार रुपये असू शकते. वाचाः Poco M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर एम३ प्रो ५जी चे भारतीय व्हेरिएंट देखील ग्लोबल व्हेरिएंट सारखेच असेल. Poco M3 Pro 5G अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२ चालतो. यात ६.५ इंचचा फूल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Poco M3 Pro 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि एआय फेस अनलॉक सपोर्ट मिळतो. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fXta0O