Full Width(True/False)

स्वस्तात मस्त! कमी किंमतीचा Samsung Galaxy M32 लाँच, ऑफरसह मिळत आहे दमदार फीचर्स

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची निर्माता कंपनी ने भारतीय बाजारात अखेर आपला नेक्स्ट जनरेशन Galaxy M32 स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनला अनेक जबरदस्त फीचर्ससोबत सादर करण्यात आले आहे. यामध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले, ६०००एमएएचची बॅटरी, ६४ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनला कंपनीने १४,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत लाँच केले असून, भारतीय बाजारात या डिव्हाइसची , , सारख्या फोन्सशी टक्कर असेल. या फोनच्या किंमत आणि उपलब्धतेबाबत जाणून घेऊया. वाचाः ची किंमत आणि उपलब्धता: Samsung Galaxy M32 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. फोनला Amazon वरून खरेदी करता येईल. फोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू रंगात येते. २८ जूनपासून सुरू होणाऱ्या सेलमध्ये फोनला ICICI बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १,२५० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. Samsung Galaxy M32 चे फीचर्स: या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस इनफिनिटी-यू एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन २४००x१०८० आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज, ब्राइटनेस ८०० निट्स आणि यात गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन मिळेल. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी८० प्रोसेसरसोबत येतो. यात ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित OneUI वर काम करतो. फोनमध्ये पॉवरसाठी २५वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी मिळेल. वाचाः Samsung Galaxy M32 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात ६४ मेगापिक्सलची प्रायमरी लेंस, दुसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर, तिसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि चौथा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळेल. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सल सेंसर मिळेल. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल-सिम सपोर्ट, ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११ b/g/n/ac, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sfb8hD