Full Width(True/False)

Samung, Apple ला टक्कर देणार Facebook, लाँच करणार शानदार स्मार्टवॉच, पाहा किती असेल किंमत

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लवकरच आपली पहिली वहिली स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारी आहेत. हे कंपनीचे पहिले असे डिव्हाइस आहे जे समार्ट वियरेबल्स सेगमेंटमध्ये लाँच केले जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फेसबुकच्या या वॉचची चर्चा आहे. ही स्मार्टवॉच पुढील वर्षीच्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक डिव्हाइस लाँच करू शकते, ज्यात स्मार्टफोन्सचा समावेश असेल. वाचाः दोन कॅमेरे आणि डिटॅचेबल डिस्प्ले Facebook Smartwatch थेट बाजारात उपलब्ध असलेल्या , , Xiaomi, Realme, Oppo, OnePlus, Huawei सह अनेक कंपन्यांच्या स्वस्त-महागड्या स्मार्टवॉचला टक्कर देईल.फेसबुकच्या पहिल्या स्मार्टवॉचमध्ये आतापर्यंत कशातही पाहायला न मिळालेले आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्टनुसार, फेसबुक स्मार्टवॉचमध्ये दोन कॅमेरे मिळतील. तसेच, याच्या डिस्प्लेला उघडून वेगळे देखील करता येईल. याशिवाय यूजर्स स्मार्टवॉचने कोणालाही मेसेज करू शकतील व सोशल मीडिया साइट फेसबुकसह इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सारखे अप्स देखील वॉचमध्ये वापरू शकतील. वाचाः Facebook Smartwatch मध्ये हेल्थ ट्रॅकर्स, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर, हार्ट रेट सेंसरसह अनेक आवश्यक फीचर्स यात मिळतील, जे सध्या इतर स्मार्टवॉचमध्ये पाहायला मिळत आहे. फेसबुकची ही वॉच प्रीमियम सेगमेंटमध्ये येईल व याची किंमत जवळपास ३० हजार असण्याची शक्यता आहे. या बजेटमध्ये अॅपलची प्रीमियम स्मार्टवॉच येते. त्यामुळे फेसबुकची पहिली स्मार्ट वियरेबल्स डिव्हाइस अॅपलच्या डिव्हाइसला टक्कर देईल. पुढील वर्षी जानेवारीत लाँच होऊ शकते. रिपोर्टनुसार, कंपनी याच्या नेक्स्ट जनरेशन डिव्हाइस मॅन्यूफॅक्चरिंग देखील करत असल्याचे सांगितले जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wWvIme