Full Width(True/False)

WhatsApp च्या या दोन ट्रिक्स खूपच कामाच्या, मोबाइल चालणार सुपरफास्ट

नवी दिल्लीः मोबाइल जर स्लो चालायला लागला तर खूपच त्रासदायक ठरते. अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. WhatsApp मध्ये अशा काही ट्रिक्स आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन फास्ट करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स संबंधी सांगणार आहोत. या चुका अनेकांकडून वारंवार होत असतात. त्यामुळे तुमच्या मोबाइल मध्ये बिनकामाच्या गोष्टीने डेटा भरला जातो. वाचाः WhatsApp च्या ट्रिक्सने फास्ट करा फोन अनेकदा पाहिले गेले आहे की, WhatsApp चे खूप सारे ग्रुप मध्ये आपल्याला घेतलेले असते. त्या ठिकाणी दिवसभर व्हिडिओ आणि फोटोज पाठवले जातात. तुमच्या स्मार्टफोनमध्ये ते आपोआप डाउनलोड होत असतात. यामुळे तुमच्या मोबाइलचे स्टोरेज बिनकामाच्या फोटो आणि व्हिडिओने भरले जाते. त्यामुळे जाणून घ्या खाली दिलेल्या ट्रिकसंबंधी. वाचाः मोबाइल स्पीड वाढवण्याची पद्धत आपल्या व्हॉट्सअॅप अकाउंट मध्ये ऑटो डाउनलोडला पूर्णपणे बंद करा. त्यामुळे कोणी काहीही पाठवले तर ते डाउनलोड होणार नाही. त्यामुळे तुमचा मोबाइलमधील स्टोरेज भरणार नाही. ऑटो डाउनलोड बंद करण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंग मध्ये जा, त्यानंतर पुन्हा स्टोरेज, डेटा मध्ये जा. त्या ठिकामी सर्व ठिकाणी नो असे करा. वाचाः मोबाइल स्पीड वाढवण्याची दुसरी पद्धत जर तुम्ही अनेक ग्रुपशी जोडले गेले आहात. आणि ऑटो डाउनलोड पण ठेवायचे असेल तर तुम्हाला वेळोवेळी डेटा क्लिन करावे लागेल. हे पण तुम्ही करू शकता. कारण, सर्वात जास्त स्टोरेज हे व्हॉट्सअॅपवरून आलेल्या फोटोज आणि व्हिडिओजने भरलेले असते. यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअॅपला ओपन करावे लागेल. आता सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर स्टोरेज आणि डेटा मध्ये जा. सर्वात वरच्या मॅनेज डेटावर क्लिक करुन तुम्ही डेटा हटवू शकता. याप्रकारच्या दोन ट्रिक्समुळे तुमचा मोबाइल क्लियर होऊन फास्ट चालेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UrebnN