नवी दिल्ली : Prime Day सेलचे २६ आणि २७ जुलैला आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये मेंबर्सला असंख्य प्रोडक्ट्सवर डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे. अनेक स्मार्टफोन्स आणि डिव्हाइसेसची या सेलमधून पहिल्यांदाच विक्री होणार आहे. यामध्ये नुकताच लाँच झालेल्या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. वाचा: घेणाऱ्या यूजर्सला अॅमेझॉनच्या अनेक सेवांचा मोफत लाभ घेता येतो. यात ग्राहकांना एक-दोन दिवसात वस्तूंची मोफत डिलिव्हरी, तसेच Prime Video, Prime Music, Prime Reading आणि free in-game content सारख्या सेवा मोफत मिळतात. प्राइम मेंबरशिपसाठी महिन्याला १२९ रुपये किंवा वर्षाला ९९९ रुपयांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. याशिवाय आणि वीआयचे असे अनेक प्लान्स आहेत ज्यात तुम्हाला प्राइम मेंबरशिप मोफत मिळते. प्राइम मेंबरशिप देणारे हे प्लान्स कोणते आहेत ते जाणून घेऊया. वीआयचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: या प्लानमध्ये एकूण ७५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. वीआयचा ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: यामध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. वीआयचा १,०९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. एअरटेलचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: यामध्ये एकूण ७५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. एअरटेलचा ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान (१+२ add-on plan) : यात एकूण २१० जीबी डेटा (१५० जीबी प्राइमरी नंबर + ३० जीबी प्रत्येक अॅड ऑन नंबरसाठी), अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. वाचा: एअरटेलचा १,५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान (१+३ add-on plan) : यामध्ये महिन्याला एकूण ५०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्रीपेड प्लान : यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जातात. एअरटेलचा १३१ रुपयांचा प्रीपेड प्लान (add-on) : या प्लानमध्ये एअरटेलच्या यूजर्सला एकूण १०० एमबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता तुमच्या सध्या सुरू असलेल्या प्लान एवढीच असेल. यात केवळ ३० दिवसांसाठी प्राइम मेंबरशिप मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zvi2iW