Full Width(True/False)

BSNLची नवीन ऑफर, एका मेसेजवर घर बसल्या मिळवा लँडलाइन-ब्रॉडबँड कनेक्शन,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. सरकारी टेलिकॉम नेटवर्क काही काळापासून खूप सक्रिय असून युजर्सना नव-नवीन ऑफर आणि विनामूल्य योजना सुविधा देत आहे. या दूरसंचार कंपनीने अलीकडेच आपल्या ब्रॉडबँड, लँडलाईन आणि प्रीपेड युजर्ससाठी अनेक प्रमोशनल ऑफर बाजारात आणल्या आहेत. असा विश्वास आहे की दूरसंचार उद्योगातील सतत वाढत्या स्पर्धेत बीएसएनएल देखील आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी हे प्रयत्न करत आहे. कंपनीने देशातील युजर्सना मदत करण्यासाठी आकर्षक डेटा प्लान्स देखील सुरू केले आहेत. आता बीएसएनएलने आपल्या बर्‍याच सेवांसाठी बुकिंग सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये युजर्स केवळ मेसेज पाठवून इच्छित कनेक्शन बुक करू शकतील. वाचा: नवीन BSNl लँडलाईन आणि ब्रॉडबँड सेवा कशी बुक करावी नवीन सेवा आता ' बीएसएनएल On Your Doorsteps नावाने ओळखली जाते. ज्यांना बीएसएनएलची ही सेवा वापरायची आहे, त्यांना संबंधित सेवांबद्धल कंपनीला एसएमएस पाठवावा लागेल.तर, लँडलाईन कनेक्शन मिळविण्यासाठी युजर्सना त्यांच्या मोबाईलवरून ५४१४१ वर LL *STD CODE SMS वर टाइप करून एसएमएस पाठविणे आवश्यक आहे. ब्रॉडबँड कनेक्शनसाठी बीएसएनएल युजर्सना त्याच नंबरवर बीबी * एसटीडीकोड मेसेज पाठवावा लागेल. तसेच, युजर्सना दोन्ही कनेक्शन हवे असतील तर त्याने एलएल बीबी * एसटीडीकोड संदेश ५४१४१ वर वर पाठवावा. तुम्ही बीएसएनएल सेवा वापरत नसल्यास, इतर कोणत्याही सिमवरून आपण कोड ९४०००५४१४ वर पाठवू शकता. याशिवाय भारत संचार निगम लिमिटेडने नवीन सेवा सुरू केल्या आहेत, ज्यात युजर्सना ऑनलाईन बिल भरण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. बीएसएनएल युजर्स क्रेडिट, डेबिट कार्ड, यूपीआय आणि इतर पद्धतींद्वारे बिल भरू शकतात. बीएसएनएलचे सर्वोत्कृष्ट डेटा पॅक BSNL ने एक नवीन ऑफर देखील बाजारात आणली आहे. ज्यात युजर्सना रात्रीच्या वेळी विशेष टॅरिफ व्हाउचरसह अनलिमिटेड डेटा वापरण्याची परवानगी आहे. ५९९ रुपयांचा हा पॅक आज म्हणजेच २१ जुलै पासून सुरू होणार असून याची वैधता ८४ दिवसांची असेल. तुम्हाला या योजनेसह विनामूल्य झिंग संगीत अ‍ॅपवर प्रवेश देखील मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eHs5tf