Full Width(True/False)

Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNLचा स्वस्त प्लान लाँच, १ जीबीची किंमत फक्त 'इतकी'

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी लागोपाठ प्रयत्न करीत आहे. आता BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान लाँच केला आहे. हा प्लान अन्य कंपनीच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. बीएसएनएलचा नवीन ब्रॉडबँड प्लान युजर्संना फक्त २९९ रुपयांत १०० जीबी डेटा ऑफर करीत आहे. JioFiber चा बेसिक ब्रॉडबँड प्लान ३९९ रुपयांचा आहे. तर Airtel XStream फायबर बेसिक प्लान ४९९ रुपयांचा आहे. दोन्ही प्लानमध्ये 40Mbps पर्यंत स्पीड सोबत अनलिमिटेड इंटरनेट मिळते. म्हणजेच BSNL चा हा प्लान दोन्ही प्लानपेक्षा स्वस्त आहे. वाचाः BSNL च्या २९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानची डिटेल्स या प्लानला घेण्याआधी लक्षात ठेवण्यासाठी आहे. बीएसएनएलचा हा प्लान फक्त नवीन ग्राहकांसाठी आहे. सध्याच्या ग्राहकांना याचा फायदा मिळू शकत नाही. या प्लानला युजर्स सह महिन्यासाठी युज करू शकतात. यासाठी प्रत्येक महिन्याला २९९ रुपयाचे पेमेंट करावे लागेल. बीएसएनएलच्या या प्लानसोबत १० एमबीपीएसच्या स्पीड सोबत 100GB डेटा मिळेल. 100GB डेटा युज झाल्यानंतर युजर्संना २ एमबीपीएसची स्पीड सोबत इंटरनेट ब्राउज करणे जारी राहिल. युजर्संना कंपनीकडून फ्री लँडलाइन कनेक्शन मिळते. युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर करते. वाचाः युजर्संना ६ महिन्यापर्यंत याचा फायदा मिळू शकतो ही योजना नवीन ग्राहकांसाठी आहे. सहा महिन्यानंतर आपोआप युजर्संना 200GB CUL ब्रॉडबँड प्लान मध्ये मायग्रेट केले जाईल. जर मॅन्यूअल रूपाने कोणताही प्लान निवडू शकता. 200GB CUL प्लान 399 रुपये प्रति महिन्यासाठी 200GB डेटा सोबत १० एमबीपीएसची स्पीड ऑफर करते. यासोबतच युजर्स बीएसएनएलचे सुपर स्टार २ डीएसएल ब्रॉडबँड प्लानचा पर्याय निवडू शकता. जो डिज्नी + हॉटस्टार प्रीमियमचा ओटीटी लाभ मिळतो. हा प्लान ९४९ रुपये प्रति महिना १० एमबीपीएस स्पीड सोबत 1,110GB डेटा देतो. यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. वाचाः ब्रॉडबँड बिझनेस मध्ये स्रवात मोठा प्लेयर आहे BSNL भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) भारतातील सर्वात मोठा ब्रॉडबँड बिझनेस चालवतो. कंपनी खूप आधीपासून ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देत आहे. बीएसएनएल फायबर ब्रॉडबँड प्लान निवडल्यास ग्राहकांना चांगली सेवा मिळते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C9zHin