Full Width(True/False)

Jio, Airtel आणि Vi च्या या ६ प्लानमध्ये मिळतोय डेली अनलिमिटेड डेटा, किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्लीः Daily Unlimited data Plan: रोज इंटरनेटची मागणी वाढली आहे. डेली डेटा कॅपच्या जागी डेली अनलिमिटेड डेटा प्लानची डिमांड वाढत आहे. याचाच अर्थ डेली मिळणाऱ्या प्लानमध्ये 1.5GB, 2GB आणि 3GB डेटा च्या प्लानची डिमांड वाढली आहे. ज्यात रोज अनलिमिटेड जीबी डेटाचा वापर केला जावू शकतो. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या विना डेली डेटा लिमिटचे प्लान लाँच करीत आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी , आणि चे डेली अनलिमिटेड डेटा चे प्री-पेड प्लानची खास माहिती देत आहोत. याची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः Reliance Jio चा ४४७ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. या प्लानमध्ये ५० जीबी जास्त डेटा ऑफर केला जात आहे. युजर आपल्या गरजेनुसार एक दिवस किंवा ६० दिवस याला वापरू शकते. याचाच अर्थ डेली डेटा लिमिट नाही. सोबत या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली फ्री एसएमएसची सुविधा मिळते. Reliance Jio चा २४७ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. यात २५ जीबी अनलिमिटेड डेटा आणि डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते. अनलिमिटेड कॉलिंग सोबत जिओ सूट अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळते. Reliance Jio चा १२७ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये १५ दिवसांची वैधता मिळते सोबत १२ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. Airtel चा ४५६ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. प्लानमध्ये ५० जीबी डेटा, डेली १०० एसएमएस मिळते. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधे सोबत अॅमेझॉन प्राइम मोबाइल एडिशन, विंक म्यूझिक, एअरटेल एक्स्ट्रीम चे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. Vi चा ४४७ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ६० दिवसांची वैधता मिळते. जास्तीत जास्त ५० जीबी डेटा ऑफर केला जातो. सोबत रोज १०० एसएमएस फ्री, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सोबत Vi आणि Vi TV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. Vi चा २६७ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. यात जास्तीत जास्त २५ जीबी डेटा, डेली १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये Vi आणि Vi TV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eAy1nN