Full Width(True/False)

ठरलं! ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार Oppo चे दोन ५जी स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : ओप्पोच्या बहुप्रतिक्षित च्या भारतातील लाँचिंगच्या तारखेची अखेर घोषणा करण्यात आली आहे. आणि स्मार्टफोन्सला १४ जुलैला लाँच केले जाणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आली असून, हे दोन्ही फोन ५जी सपोर्टसह येतील. वाचा: Reno 6 Pro 5G आणि Reno 6 5G दोन्हीमध्ये बेस्ट इमेजिंग तंत्रज्ञान मिळेल. ओप्पोचे म्हणणे आहे की या दोन्ही फोनमध्ये बोकेह प्लेयर पोर्ट्रेट व्हिडीओ मोडसोबत एआय हायलाइट व्हिडीओ आणि प्रोफेशनल कॅमेरा फीचर देखील मिळेल. Oppo Reno 6 सीरिजची विक्री फ्लिपकार्टवरून होईल. OPPO Reno 6 Pro 5G आणि Reno 6 5G दोन्ही स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा ५जी प्रोसेसर मिळेल. यात ६५ वॉटची सुपरवूक २.० फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या सीरिजच्या तीन व्हेरिएंटला गेल्या महिन्यता चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. Oppo Reno 6 Pro, Oppo Reno 6 ची किंमत Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 ची किंमत चीनी व्हेरिएंटची जवळपासच असेल. Oppo Reno 6 Pro च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची चीनमध्ये किंमत ३,४९९ युआन (जवळपास ३९,८०० रुपये) आहे. तर Oppo Reno 6 ची सुरुवाती किंमत २,७९९ युआन (जवळपास ३१,८०० रुपये) आहे. Oppo Reno 6 Pro चे स्पेसिफिकेशन Oppo Reno 6 Pro मध्ये ६.५५ इंच फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले मिळेल. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज असेल. फोनमध्ये मीडियाटेक Dimensity १२०० प्रोसेसर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये ४ रियर कॅमेरे मिळतील, ज्यातील ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर असे. यामध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dx8qeM