नवी दिल्लीः इंटरनेटची वाढती मागणी पाहून टेलिकॉम कंपन्यांनी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान लाँच करीत आहेत. या प्लानमध्ये कंपनी तुम्हाला डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दुसरे अन्य बेनिफिट देत आहे. आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या अशा प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. ज्यात तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा मिळतो. सोबत अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि अन्य फायदे मिळतात. जाणून घ्या या प्लान्स विषयी डिटेल्स. वाचाः Airtel चा 1.5GB चा प्लान डेली १.५ जीबी डेटाच्या प्लानसाठी तुम्ही एअरटेलचे २४९ रुपये, २७९ रुपये, ३९९ रुपये, ४९७ रुपये, ५९८ रुपये, आणि २३९८ रुपयांचे प्लान खरेदी करू शकता. यात २४९ रुपये, २७९ रुपये आणि २९७ रुपयांचे प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. तर ३९९ रुपये आणि ४९७ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. तर ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची आणि २३९८ रुपयांच्या प्लानची वैधता ही ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाः Jio चा 1.5GB चा प्लान जिओचे असे अनेक प्लान आहेत. ज्यात डेली १.५ जीबी डेटा मिळतो. १९९ रुपये, ३९९ रुपये, ५५५ रुपये पासून २१२१ रुपयांपर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्लान खरेदी करू शकता. या सर्व प्लानमध्ये तुम्हाला डेली १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनुक्रमे २८ दिवस, ५६ दिवस, ८४ दिवस आणि ३६५ दिवसाची वैधता मिळते. या सर्व प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट, २ हजार मिनिट, ३ हजार मिनिट १२ हजार मिनिट दिले जाते. वाचाः Vodafone चा 1.5GB चा प्लान वोडाफोनचा २४९ रुपये, ३९९ रुपये, ५९९ रुपये आणि २३९९ रुपयांचा प्लान खरेदी करू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला अनुक्रमे २८ दिवस, ५६ दिवस, ८४ दिवस आणि ३६५ दिवसांची वैधता मिळते. या सर्व प्लानमध्ये तुम्हाला डेली १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UjPEke