Full Width(True/False)

इतरांचे WhatsApp स्टेट्स डाउनलोड करायचे आहे ? खूपच सोपी आहे पद्धत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स , आणि वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्लॅटफॉर्मवरील स्टेट्स फीचर लोकप्रिय आहे. लोक WhatsApp वर फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट स्टेट्स म्हणून ठेवत असतात. वाचाः वर दररोज लाखो फोटो आणि व्हिडीओ स्टेट्स स्वरूपात पोस्ट केले जातात. २४ तासांनंतर हे स्टेट्स आपोआप गायब होते. अनेकदा आपल्याला मित्र अथवा नातेवाईकांना ठेवलेले स्टेट्स आवडते व ते डाउनलोड करायचे असते. मात्र स्टेट्स डाउनलोड कसे करायचे हे लक्षात येत नाही. अनेकजण व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचा स्क्रीन शॉट काढून सेव्ह करतात. मात्र, व्हिडीओ डाउनलोड करणे शक्य होत नाही. आज तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्टेट्सवरील व्हिडीओ डाउनलोड करू शकता. तुमच्या फोनमध्येच स्टेट्सचे फोटो आणि व्हिडीओ डाउनलोड झालेले फोटो असतात. हे स्टेट्स कोठे स्टोर होतात जाणून घेऊया. वाचाः फोनमध्येच असते स्टेट्स फोल्डर तुमच्या फोनमधील एका फोल्डरमध्येच WhatsApp स्टेट्सचे फोटो आणि व्हिडीओ डाउनलोड होत असतात. तुम्ही समोरील व्यक्तीचे स्टेट्स पाहिल्यानंतर ते आपोआप फोल्डरमध्ये डाउनलोड होते. असे शोधा फोल्डर
  • यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम status फोल्डरला अनहाइड करावे लागेल.
  • सर्वात आधी फाइल मॅनेजरच्या मेन्यू बारमध्ये जा.
  • आता तुम्हाला एक सेटिंग्सचा पर्याय दिसेल.
  • सेटिंग्सवर क्लिक केल्यानंतर Unhide Files चा पर्याय दिसेल.
  • अनहाइड केल्यानंतर फाइल मॅनेजरमध्ये WhatsApp फोल्डरवर क्लिक करा.
  • आता मीडिया फोल्डर दिसेल, येथे statuses नावाने हिडन फोल्डर दिसेल.
  • येथे तुम्हाला स्टेट्स असणारे फोटो आणि व्हिडीओ दिसतील.
  • तुम्ही या फोटो अथवा व्हिडीओला सेव्ह करू शकता किंवा पाहू शकता.
थर्ड पार्टी अ‍ॅप WhatsApp स्टेट्स डाउनलो करण्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅप देखील वापरू शकता. मात्र, हे WhatsApp चे अधिकृत अ‍ॅप्स नाहीत. तुम्ही Google Play Store वरून हे अ‍ॅप्स डाउनलोड करू शकता. मात्र, यामुळे डेटा चोरीचा धोका असतो. त्यामुळे फोनमधील फीचरच वापरणे चांगले. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36iGF5W