Full Width(True/False)

Boult ने शानदार फीचर्ससह लाँच केले नवीन इयरफोन्स, किंमत फक्त...

नवी दिल्ली : ऑडिओ ब्रँड ने ग्राहकांसाठी नवीन नेकबँड स्टाइल लाँच केले आहे. या इयरफोन्सची वैशिष्ट्ये सांगायची तर हे वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स५ रेटिंग, सिरी आणि गुगल असिस्टेंट सपोर्टसह येतात. या इयरफोन्सचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया. वाचा: Boult Audio ProBass Qcharge चे स्पेसिफिकेशन्स कंपनीने या इयरफोन्सला इनबिल्ट एरोस्पेस ग्रेड एलॉय मायक्रोवूफरसोबत सादर केले आहे, जे एक्स्ट्रा बेस देतात. बॅटरी लाइफबद्दल सांगायचे तर यामध्ये २४ तास प्लेबॅक टाइम मिळेल. एवढेच नाही तर कंपनीचा दावा आहे की, १५ मिनिटं चार्ज केल्यावर १५ तास वापरू शकता. वॉटर आणि स्वेट रेसिस्टेंटसाठी Boult Audio ProBass Qcharge नेकबँड इयरफोन्स IPX५ रेटिंसह येतात. कानात व्यवस्थित बसण्यासाठी ६० डिग्री अँगल टनल डिझाइनसोबत सादर करण्यात आले आहे व याचे वजन ८९ ग्रॅम आहे. Boult सोबत गुगल असिस्टेंट आणि सिरी वॉइस असिस्टेंटचा सपोर्ट मिळेल. इयरफोन्सवर वॉल्यूम, कॉल्स आणि मीडिया प्लेबॅक कंट्रोल मिळेल. Boult Audio ProBass Qcharge ची किंमत या नेकबँड इयरफोन्सची किंमत १,१९९ रुपये आहे. ग्राहक इयरफोन्सला वरून ब्लॅक, ग्रीन आणि ब्लू रंगात खरेदी करू शकता. कंपनी यासोबतच १ वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kiaaLA