Full Width(True/False)

गुड न्यूज़! Realme DIZO सप्टेंबर महिन्यात लाँच करणार ७ नवीन प्रोडक्ट्स, ईयरबड्स आणि स्मार्टवॉचचा समावेश

नवी दिल्लीः Realme आपल्या सब-ब्रँड DIZO ला एक स्मार्टवॉच, दोन फीचर फोन, एक TWS वायरलेस इयरफ़ोन ला लाँच करून आपली मार्केटमधील उपस्थितीची नोंद केली आहे. आता कंपनी भारतातील सीईओ अभिलाष पांडाने नुकतेच एक ट्विट करून हे संकेत दिले आहेत की DIZO लवकरच देशात आपल्या प्रोडक्ट्सचे पुढील प्रोडक्ट्सचा सेट लाँच करण्यासाठी तयार आहे. आतापर्यंत तारखेची घोषणा करण्यात आली नाही. 91mobiles च्या रिपोर्टनुसार, ही लाँचिंग सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात स्मार्ट इंटरटेमेंट कॅटेगरीत एकूण ७ प्रोडक्ट्स लाँच करू शकते. ज्यात तीन TWS ईयरबड, दोन स्मार्टवॉच आणि अन्य प्रोडक्ट्सचा समावेश आहे. वाचा: TWS ईयरबडची लाँचची घोषणा आधीही झाली आहे DIZO आपल्या TWS ईयरबड्सला ऑगस्ट मध्ये लाँच करणार होते. परंतु, आता लाँचिंग सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. कंपनीने नुकतेच ट्विटर वर DIZO GoPods आणि DIZO GoPods Neo TWS ईयरबड्सला टीज केले होते. यात आणखी एक प्रोडक्ट्स येणार आहे. वाचा: चे लक्ष्य दोन वर्षात TWS मध्ये नंबर वन ब्रँड बनवणे आधीच्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये म्हटले की, एक किंवा दोन TWS ईयरबड्स मध्ये ANC (एक्टिव नॉइज़ कँसिलिंग टेक्नोलॉजी) चा सपोर्ट मिळेल. यानंतर अतिरिक्त DIZO Go Pods D च्या अपकमिंग ईयरबड्सची डिझाइन असेल. तसेच याची किंमत लाँचिंगवेळी स्पष्ट होईल. DIZO यावर्षीच्या अखेरपर्यंत एकूण २० प्रोडक्ट्सला लाँच करण्याची योजना बनवत आहे. यात ऑडियो आणि योग्य कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. Realme DIZO चे लक्ष्य म्हणजे दोन वर्षात देशात TWS मध्ये नंबर वन ब्रँड बनवणे आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bfiumb