Full Width(True/False)

फोन वर्षभर वापरल्यानंतर देखील परत करता येणार ! Realme GT Master Edition चा पहिला सेल आज, होणार १५ हजारांपर्यंत बचत

नवी दिल्ली : आज , २६ ऑगस्ट भारतात विक्रीसाठी दुपारी १२ वाजतापासून उपलब्ध होणार आहे. गेल्या आठवड्यात Realme GT फ्लॅगशिप सोबत लाँच करण्यात आले होते . हे १२० Hz सुपर AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरासह येते.Realme GT Master Edition च्या इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी चिपसेट, ८ जीबी पर्यंत रॅम आणि ६५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगचा समावेश आहे. वाचा: Realme GT Master Edition : किंमत आणि ऑफर भारतात Realme GT Master Edition च्या बेस ६GB+१२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २५,९९९ रुपयांपासून सुरू होते. हा फोन ८GB+१२८ GB आणि ८ GB+२५६ GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. ज्याची किंमत अनुक्रमे २७,९९९ आणि २९,९९९ रुपये आहे. Realme GT मास्टर एडिशन कॉसमॉस ब्लू, लुना व्हाइट आणि व्हॉयेजर ग्रे रंगांमध्ये येते. नुकतेच लाँच झालेले Realme GT Master Editionआज दुपारी १२ पासून ८GB+१२८GB आणि ८GB+२५६GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध होईल जे कॉसमॉस ब्लू आणि लुना व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध असतील. Voyager Gray मध्ये ६GB + १२८GB स्टोरेज प्रकार नंतर उपलब्ध होईल. फोनची विक्री फ्लिपकार्ट, Realme.com आणि देशातील प्रमुख रिटेल स्टोअर्सवर होईल. Realme GT Master Edition वरील सेल ऑफरमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहाराद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी २,००० रुपयांची त्वरित सूट समाविष्ट आहे. ग्राहक फ्लिपकार्टच्या अपग्रेड प्रोग्रामचा लाभ देखील घेऊ शकतात, ज्या अंतर्गत ग्राहक त्याच्या किंमतीच्या ७० टक्के ऍडव्हान्स रक्कम भरून फोन मिळवू शकतील, जे एक वर्षाच्या वापरानंतर परत देखील करता येतील. याशिवाय, फ्लिपकार्ट जुन्या फोनची देवाणघेवाण करून नवीन Realme GT मास्टर एडिशन खरेदीवर १५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील देत आहे. एक्सचेंज बोनसची रक्कम जुन्या फोनच्या कंडिशन-मॉडेलवर अवलंबून असेल. Realme GT Master Edition मध्ये काय खास आहे हा फोन ड्युअल-सिम (नॅनो) Realme GT मास्टर एडिशन Android ११ वर काम करतो. जे Realme UI २.० वर आधारित आहे. यात ६.४३ इंच फुल-एचडी+ (१०८०x२४०० पिक्सेल) सुपर एमोलेड डिस्प्ले २० :९ आस्पेक्ट रेशियो आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह आहे. हुड अंतर्गत, फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८G प्रोसेसर आहे, जो ८GB पर्यंत रॅमसह जोडला गेला आहे. हा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी, Realme GT Master Edition मध्ये ३२ मेगापिक्सलचा Sony IMX615 कॅमेरा आहे. Realme GT Master Edition मध्ये २५६ GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज दिले गेले आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. शिवाय, फोनमध्ये ४,३०० mAh ची बॅटरी आहे. जी, ६५ W सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Wj70iT