Full Width(True/False)

गुड न्युज ! आता WhatsApp वर बुक करता येणार करोना Vaccination Slot , मिनिटांत होणार तुमचे काम

नवी दिल्ली : WhatsAppआपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, हे लक्षात घेता आता व्हॉट्सअॅपने युजर्सच्या आरोग्याच्या दृष्टीने एक नवीन सेवा सुरु केली आहे. ही सेवा कोरोना लसीकरणाशी संबंधित असून याअंतर्गत तुम्ही WhatsApp च्या मदतीने Covid-19 Vaccination स्लॉट बुक करू शकाल. व्हॉट्सअॅपने मंगळवारी सांगितले की, मायगव्ह करोना हेल्पडेस्क वापरून युजर्स आता त्यांचे जवळचे लसीकरण केंद्र शोधू शकतील आणि त्यांच्या Vaccination व्हिजिट देखील बुक करू शकतील. वाचा: WhatsApp ने यापूर्वी दिली होती प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा ५ ऑगस्ट रोजी मायगव्ह आणि व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी चॅटबॉट वरून लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी सेवा सुरू केली आणि आतापर्यंत देशभरातील ३२ लाख युजर्सने लस प्रमाणपत्र डाउनलोड केले आहे. व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी चॅटबॉक्सच्या माध्यमातून करोनाविषयी पसरलेली चुकीची माहिती काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. व्हॉट्सअॅप सार्वजनिक धोरणाचे संचालक शिवनाथ ठुकराल, म्हणाले की, एक व्यासपीठ म्हणून, आम्ही या महामारीशी लढण्यासाठी आमच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. WhatsApp वर Vaccination स्लॉट सहज बुक करा यासाठी, सर्वप्रथम, MyGov कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉटशी संपर्क साधण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर +९१ ९०१३१२५१५१५ हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंतर बुक स्लॉट टाइप करून चॅट सुरू करा आणि सेव्ह केलेल्या नंबरवर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाइल फोन क्रमांकावर सहा अंकी वन-टाइम पासवर्ड तयार होईल. आता तुम्हाला पिनकोड आणि लसीच्या प्रकारावर आधारित पसंतीची तारीख आणि स्थान निवडावे लागेल. तारीख आणि स्थान निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्राचे पर्याय मिळतील, तुमच्या आवडीचे लसीकरण नियुक्ती केंद्र निवडा आणि स्लॉट सहज बुक करा. वाचा : वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yfsav3