नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स साइट लवकरच सेलचे आयोजन करणार आहे. या सेलमध्ये MI, Samsung, Oppo सारख्या ब्रँड्सचे नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार असून, यावर डिस्काउंट ऑफर्स आणि डील्सचा लाभ घेता येईल. सेलमध्ये डिस्काउंटसह नवीन स्मार्टफोन खरेदीची सुवर्णसंधी आहे. वाचा: हा फोन २८ सप्टेंबरला लाँच होणार आहे. यात ६.७ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल आणि सेल्फी कॅमेरा इनफिनिटी ओ कटआउट आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८जी ५जी प्रोसेसरसह ६जीबी रॅम आणि १२८जीबी बिल्ट-इन स्टोरेज मिळते. फोनमध्ये रियरला ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ५००० एमएएचची बॅटरी, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, एनएफसी, यूएसबी-सी आणि ब्लूटूथ ५.० दिले आहे. Mi 11 Lite NG 5G फोनला २९ सप्टेंबरला लाँच केले जाईल. यात ६.५५ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि पीक ब्राइटनेस ८०० निट्स आहे. यात स्नॅपड्रॅगन ७८०जी SoC ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. फोन ६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम +१२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोरेज अशा चार व्हेरिएंटमध्ये येईल. Mi 11 Lite NG 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सल आहे. ४,२५० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. iQOO Z5 5G स्मार्टफोन आज (२७ सप्टेंबर) लाँच होणार आहे. यात स्नॅपड्रॅगन ७७८जी SoC सपोर्ट मिळेल. यात रियरला ६४ + ८ + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा शानदार कॅमेरा मिळेल. फोन १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज अशा तीन व्हेरिएंटमध्ये येईल. यात ६६७ इंच फुल एचडी एलसीडी डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन अँड्राइड ११ आधारित ओरिजिन ओएस १.० वर काम करतो. यात ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. Oppo A series ओप्पो आपल्या नवीन स्मार्टफोनला १ ऑक्टोबरला लाँच करेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळले. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी एआय पॉवर्ड कॅमेरा, २ मेगापिक्सल बोकेह आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा मिळेल. ओप्पो ए-सीरिज लाइनमध्ये A31 आणि A74 5G आधीपासूनच उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3F5naxV