Full Width(True/False)

Apple Event २०२१: iPhone १३ सीरिजमध्ये मिळू शकते १ टीबी स्टोरेज, ‘हे’ प्रोडक्ट्स देखील होणार लाँच

नवी दिल्ली : च्या California Streaming इव्हेंटचे आज आयोजन केले जाणार आहे. या इव्हेंटमध्ये सीरिज, सारखे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता आहे. मध्ये शानदार कॅमेरा, डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. यातील काही फीचर्स सीरिजच्या प्रो मॉडेलमध्ये देखील मिळेल. Apple विश्लेषक मिंग-ची कू नुसार, आणि 13 Pro Max मध्ये १ टीबी स्टोरेजचा पर्याय मिळू शकतो. iPhone मध्ये पहिल्यांदाच एवढे स्टोरेज मिळेल. वाचा: या इव्हेंटमध्ये आयफोन १३ सीरिजला लाँच केले जाईल. iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 Mini चा समावेश आहे. दरवर्षी नवीन आयफोन सीरिजमध्ये या मॉडेल्सचा समावेश असतो. फोन्सच्या डिस्प्ले साइजमध्ये कोणताही बदल नसेल. मात्र, प्रो मॉडेलमध्ये अधिक फीचर्स मिळू शकतात. १ टीबी स्टोरेजचा पर्याय केवळ iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max साठी असेल. iPhone 13 आणि iPhone 13 Mini मध्ये १ टीबी स्टोरेज मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण प्रो मॉडेल्समध्ये एवढे स्टोरेज दिल्यास याची किंमत देखील अधिक असेल. Kuo यांच्यानुसार जास्त किंमत असताना देखील आयफोन १३ च्या शिपमेंटमध्ये वर्ष-दर-वर्षी वृद्धी होऊ शकते. सोबतच, चिप तुटवडा असताना आयफोन १३ लाँच होणार आहे, मात्र आयफोन १३ चा आयफोन १२ च्या शिपमेंटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. १४ सप्टेंबरला नवीन आयफोन आणि अ‍ॅपल वॉच मॉडेल लाँच केले जातील. मात्र, नेक्स्ट जनरेशन एअरपॉड्स देखील लाँच होऊ शकतात. एअरपॉड्स ३ हे वायरलेस इयरफोन्स असतील, जे ओरिजिनल एअरपॉड्सची जागा घेतील. 3 ची किंमत ओरिजिनल एअरपॉड्सच्या समान असू शकते. लाँचिंगनंतर AirPods ची किंमत कमी केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, AirPods 3 ची किंमत AirPods 2 च्या तुलनेत अधिक असू शकते. एअरपॉड्स २ ची किंमत एअरपॉड्स ३ च्या लाँचिंगनंतर बदलणार नाही व हे वियरेबल्समध्ये Apple ची नवीन कॅटेगरी बनेल.गेल्या काही महिन्यात एअरपॉड्सच्या विक्रीत घट झाली आहे व यात लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, २०२२ च्या पहिल्या तिमाहीत एअरपॉड्सच्या विक्रीत १५ टक्के वृद्धी होऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C8RR2H