Full Width(True/False)

Apple ने लपवली Watch Series 7 च्या CPU ची माहिती, आता डॉक्यूमेंटमधून झाला मोठा खुलासा

नवी दिल्ली : Apple चे स्पेसिफिकेशन्स एका कथित इंटर्नल डॉक्यूमेंटद्वारे लीक झाले आहे. ने १४ सप्टेंबरला एका इव्हेंटमध्ये , आणि ९ th जनरेशन आयपॅडसह वॉच सीरिज ७ ला लाँच केले आहे. कंपनीने वॉच सीरिज ७ च्या पूर्ण स्पेसिफिकेशन्सचा खुलासा मात्र केला नव्हता. वाचा: टिपस्टरने ट्विटरवर दिली माहिती आता वॉचचे स्पेसिफिकेशन्स एका डॉक्यूमेंट्समुळे समोर आले आहे. वॉच सीरिज ७ चे डिटेल्ड स्पेसिफिकेशन्स कथितरित्या ट्विटरवर एका यूजरने लीक केले आहे. अ‍ॅपल वॉच – तेव्हा आणि आता नावाच्या एका कागदपत्रात वॉच सीरिज ७ आणि वॉच एसईच्या तुलनेत वॉच सीरिज ७ च्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. कागदपत्रांनुसार, वॉच सीरिज ७ मध्ये SiP चिपसेट दिली आहे. डेव्हलपर स्टीव्ह ड्राउटन स्मिथनुसार, नवीन चिपसेट सीरिज ६ चे एक रिब्रँडेड व्हर्जन आहे. त्यांनी माहिती दिली की, अ‍ॅपलने वॉच सीरिज ७ प्रोसेसर सीपीयूबाबत खूप कमी माहिती दिली होती. कारण, हे गेल्यावर्षीप्रमाणेच आहे. कागदपत्रांवरून माहिती मिळते की, दोन्ही वॉचमध्ये ६४-बिट ड्यूल-कोर प्रोसेसर आहे. ज्याबाबत दावा केला आहे की, हे वॉच एसईला पॉवर देणाऱ्या चिपसेटपेक्षा २० टक्के फास्ट आहे. वजनाबाबत समोर आली माहिती कागदपत्रांमध्ये वॉचच्या वजनाबाबत देखील माहिती मिळते. वॉच सीरिज ७ च्या अ‍ॅल्यूमिनियन व्हर्जनच्या ४१एमएम आणि ४५एमएम व्हेरिएंटचे वजन ३८.८ ग्रॅम आहे. टायटेनियम व्हर्जनचे वजन ४२.३ ग्रॅम आणि ५१.५ ग्रॅम आहे. अ‍ॅपल वॉच सीरिज ७ मध्ये वॉच सीरिज ६ आणि वॉच एसई प्रमाणेच ३२ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असू शकते. वॉच सीरिज ७ च्या वैशिष्ट्यांबाबत अनेक माहिती समोर येत आहे. मात्र, कंपनीकडून वॉच उपलब्ध करण्यात आल्यानंतरच याचा खुलासा होऊ शकेल. अन्य स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर, एकदा चार्ज केल्यानंतर १८ तासांची बॅटरी लाइफ मिळेल. फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. नवीन वॉच वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स६ आणि WR५० सर्टिफिकेशनसह येते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nGW7m8