मुंबई- 'देवयानी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. संग्राम आणि अभिनेत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. संग्राम आणि खुशबू यांच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. खुशबूने संग्रामसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रावर शेअर करत लिहिलं, 'आम्ही आमच्या कुटुंबात आणखी थोडं प्रेम वाढवणार आहोत.' तर संग्रामनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा आणि खुशबूचा फोटो शेअर केला. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, 'आई होणाऱ्या खुशबूला खूप खूप शुभेच्छा. आता तुला त्रास द्यायला मी एकटाच नसेन. सर्व गुन्ह्यात माझी साथ देणाऱ्या छोटुश्या पार्टनरची मी वाट पाहतोय.' संग्रामच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर खुशबूच्या फोटोंवरही सुयश टिळक, मयुरी देशमुख, गौरी नलवडे, हृता दुर्गुळे, तेजस्विनी पंडीत, श्रेया बुगडे यांनी अभिनंदन करणा-या कमेंट केल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री अभिज्ञा भावेने ‘फायनली. सिक्रेट सर्वांना समजलंय, आता यावर खुलेपणानं बोलता येईल . अभिनंदन. लव्ह यु. अशी कमेंट केली आहे. संग्राम अलीकडेच प्रेक्षकांना 'आई माझी काळूबाई' या मालिकेत दिसला होता. खुशबूने देखील अनेक मराठी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. खुशबू आणि संग्राम यांच्या पोस्टवर चाहत्यांच्या लाइक आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yMhrZa