मुंबई- फक्त मराठी चित्रपटसृष्टीतीलच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांचादेखील गणपती बाप्पा लाडका आहे. त्यामुळे मराठी कलाकारांप्रमाणे काही बॉलिवूड कलाकारांच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन होतं. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या घरी देखील गणपतीचं आगमन झालं आहे. करिनाने चाहत्यांसोबत बाप्पाची पूजा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. इतकंच नाही तर करिनाने बाप्पाच्या मूर्तीसोबतच तिच्या लाडक्या तैमूरने तयार केलेली मूर्ती देखील पूजेसाठी ठेवली आहे. करिनाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले. ज्यात करिना तैमूर आणि सैफसोबत दिसत आहे. करिना आणि सैफने साधे कपडे घातले आहेत मात्र तैमूरने नवा कुरता परिधान करत त्याच्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे. तैमूर बाप्पासमोर हात जोडून उभा आहे. महत्वाचं म्हणजे करिनाने तैमूरने चिकन मातीपासून तयार केलेली गणपतीची मूर्तीदेखील मोठ्या मूर्तीसोबत ठेवली आहे. आणि ते त्याची पूजा करत आहेत. करिनाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. करिना आणि सैफसोबत तैमूरला गणपतीची पूजा करताना पाहून नेटकरी आनंदित झाले आहेत. नेटकरी करीना आणि सैफचं कौतुक करत आहेत. तुम्ही खरे पावर कपल आहात असं म्हणत नेटकऱ्यांनी सैफ आणि करिनाचं कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांना करिना आणि सैफच्या या वागण्याचं आश्चर्य वाटलं आहे. करिना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात झळकणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lc8VOv