मुंबई- लोकप्रिय अभिनेता याच्या मृत्यूने चाहत्यांना जबरदस्त झटका बसला आहे. सिद्धार्थ या जगात नाही या गोष्टीवर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी कठीण झालं आहे. चाहत्यांची लाडकी सिडनाजची जोडी तुटल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर एका चाहतीचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. आता ती चाहती अंशिक प्रमाणात कोमात गेल्याची माहिती मिळते आहे. सिद्धार्थची ही चाहती तिच्या घरातील बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. सध्या या चाहतीला इस्पितळात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सिद्धार्थचे मित्र आणि डॉक्टर असलेले जयेश ठाकर यांनी ट्विटरवर या संपूर्ण प्रकारबद्दलची माहिती दिली. जयेश यांनी चाहतीचा इस्पितळातील फोटो शेअर करत सिद्धार्थच्या चाहत्यांना एकटं न राहण्याची आणि घरातील व्यक्तींसोबत संवाद साधण्याची विनंती केली आहे. जयेश यांनी ट्वीट करत लिहिलं, 'लवकर बरी हो. डॉक्टरांनी म्हटलं आहे की, ती अंशिक कोमात गेली आहे. अती ताणामुळे तिच्या डोळ्यांची बुबुळं आणि शरीरातील काही अवयवांची हालचाल होत नाहीए. मी सिद्धार्थच्या चाहत्यांना शांत राहण्याची विनंती करतो. मला माहितीये की हे सोपं नाहीये पण आपल्याला सिद्धार्थला जाऊ द्यावं लागेल.' सिद्धार्थचं २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्याच्या जाण्याने कुटूंबीयांसोबतच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शहनाज गिल हिची देखील अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रत्येकालाच सिद्धार्थच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. सलमान खान सह इतरही बॉलिवूड कलाकारांनी सिद्धार्थला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3h4nh29