मुंबई: हिंदी मालिका, चित्रपटरसिकांसाठी गुरुवारची सकाळ मनाला चटका लावणारी ठरली. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता याच्या निधनाच्या वृत्तानं सारेच हादरले. अवघ्या ४० वर्षांच्या सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याचे कुटुंबिय, मित्र, चाहते अद्यापही या धक्क्यातून सावरले नाहीत. सिद्धार्थच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही ऑनलाईन प्रार्थना सभा असणार आहे. यात चाहत्यांनाही सहभागी होता येणार आहे. अभिनेता करणवीर बोहरा यानं या ऑनलाईन प्रार्थना सभेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. करणवीरनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज आणि मित्र परिवाराच्यावतीने सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. सिद्धार्थच्या सहवासातील आठवणींना उजाळा द्यावयाचा असेल त्यांनी आज (दिनांक ६ सप्टेंबर)या ऑनलाईन सभेत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं करणवीरकडून करण्यात आलं आहे. छोट्या पडद्यावरचा मोठा स्टारसन २००८मध्ये 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून सिद्धार्थने छोट्या पडद्यावर अभिनयास सुरुवात केली. मात्र, 'बालिका वधू' या मालिकेतून सिद्धार्थ घराघरात पोहोचला. 'जाने पहचाने से अजनबी', 'सीआईडी' आणि 'लव यू जिंदगी' या मालिकांमध्येही त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली. तंदुरुस्तीबद्दल विशेष जागरूक असलेला सिद्धार्थ 'बिग बॉस' जिंकल्यानंतर सिद्धार्थ सातत्याने चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वी त्याची ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. अलीकडेच तो 'बिग बॉस ओटीटी'मध्ये शहनाज गिलसोबत दिसला होता. यापूर्वी तो 'बिग बॉसचा १३'च्या सीझनचा विजेता ठरला होता. 'खतरों के खिलाडी'चा सातवा सीझनही त्याने जिंकला होता. १२ डिसेंबर, १९८० रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने प्रारंभी मॉडेलिंग केले. सन २०१४मध्ये 'हंम्टी शर्मा की दुल्हनिया' सिनेमात तो दिसला होता. दोनदा मृत्यूला चकवले यापूर्वी सिद्धार्थने दोन वेळा मृत्यूला चकवले होते. सन २०१८मध्ये सिद्धार्थच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. यामध्ये सिद्धार्थसह पाच जण गंभीर जखमी झाले होते. तर त्या


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38Q9Lul