Full Width(True/False)

मलायकाला आवडतात 'फ्लर्टी' मुलं, किस करण्यात अर्जुन सर्वोत्तम

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या अदा पाहून चाहते घायाळ होतात. सध्या मलायका मोठ्या पडद्यापासून भलेही दूर असेल परंतु, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मलायका चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आणि मलायका यांचं नातं आता जगजाहीर आहे. अगोदर लपून- छपून भेटणारे हे कलाकार आता बिनधास्तपणे डेटवर जाताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने तिला पुरुषांमधील कोणत्या गोष्टी आकर्षित करतात याचा खुलासा केला आहे. नुकतीच मलायकाने अभिनेता आणि मॉडेल याच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रमात मिलिंदने मलायकाला विचारलं की, तिला पुरुषांमधील कोणत्या गोष्टी आकर्षित करतात. तेव्हा मलायकाने बिनधास्तपणे उत्तर देत तिचं गुपित सांगितलं. मलायका म्हणाली, 'मला खरं तर रफ मुलं आवडतात. दिसायला आणि वागायला डॅशिंग असणारी मुलं आवडतात. मला साधीभोळी मुलं आवडत नाहीत. मला माझ्यासोबत खूप जास्त फ्लर्ट करणारी मुलं आवडतात. महत्वाचं म्हणजे जो मुलगा खूप चांगला किस करत असेल तो मला खूप आवडतो.' अर्जुनबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, तो खूप चांगला किस करतो. त्यामुळे तिला अर्जुन आवडतो. यानंतर अर्जुनला शेवटचा मेसेज काय केला होता अशी विचारणा करताच मलायकाने लाजत उत्तर दिलं, 'आय लव्ह यू टू.' यानंतर मिलिंदने तुला सगळ्यात जास्त चांगलं कोण ओळखतं असं विचारताच मलायकाने अर्जुनचं नाव घेतलं. आवडत्या अभिनेत्यासाठी मलायकाने डॅनिअल क्रेग तर अभिनेत्रीसाठी बेला हदीद हिचं नाव घेतलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lQ9zl3