नवी दिल्लीः जगातील सर्वात पॉप्युलर सर्च इंजिन गुगल आज आपला २३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. या निमित्त गुगलने एक खास डुडल साकारले आहे. या डुडल मध्ये एक केक आहे. त्यावर २३ असं लिहिलेलं आहे. या डुडल मधील गुगल मध्ये 'L' च्या जागी कँडल लावली आहे. याला एनिमेटेड करण्यात आले आहे. कंपनी प्रत्येक खास दिवशी किंवा उत्सवानिमित्त स्पेशल डुडल बनवत असते. जाणून घ्या या खास डूडल संबंधी. अनेकदा बदलली बर्थ डेट गुगलचा बर्थ डे याआधी अनेक तारखेला सेलिब्रेट करण्यात येत होता. गुगलने सर्वात आधी आपला बर्थ डे ७ सप्टेंबर २००५ रोजी साजरा केला होता. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी, त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी साजरा केला होता. परंतु, आता २७ सप्टेंबर रोजी गुगलने आपल्या सर्च इंजिनवर पेज सर्च नंबरचा नवीन रेकॉर्ड कायम केले आहे. या दिवशी गुगलचा बर्थ डे २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. १९९८ मध्ये झाली सुरुवात गुगलची सुरुवात वर्ष १९९८ मध्ये कॅलिफॉर्नियाच्या स्टॅनफोर्ट विद्यापीठातील दोन विद्यार्थी लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी केली होती. लॅरी पेज आमि सर्गी ब्रिन यांनी गुगलला अधिकृत लाँच करण्याआधी याचे नाव 'Backrub' ठेवण्यात आले होते. यानंतर याला बदलले आहे. तर २०१५ मध्ये Alphabet Inc ला गुगलची पुर्नबांधणी करून याला मूळ कंपनी बनवण्यात आले. भारतीय मूळचे सुंदर पिचाई यांना ३ डिसेंबर २०१९ पासून अल्फाबेटचे सीईओ बनवण्यात आले आहेत. १०० हून जास्त भाषेत उपलब्ध गुगल जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. यात जवळपास १०० हून जास्त भाषेत सर्च केले जावू शकते. भारतात गुगल ने अनेक भाषेचा समावेश केला आहे. सध्या याची वेळोवेळी लोकप्रियता वाढली जात आहे. याचे युजर्संही वेगाने वाढत आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kHvn2P