नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी ने वरील ८ अ‍ॅप्सला बॅन केले आहे. हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यावर पैसे जिंकण्याचे लालच दिले जात होते. यावर्षी मे महिन्यात आयोजित इव्हेंटमध्ये कंपनीने खुलासा केला होता की, प्ले स्टोरवर जवळपास ३ बिलियन अ‍ॅक्टिव्ह अँड्राइड डिव्हाइस आणि अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यातील काही धोकादायक आहेत. सिक्योरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या मदतीने गुगलने या बनावट अ‍ॅप्सची ओळख करत, अशा अ‍ॅप्सला प्ले स्टोरवरून हटवले आहे. वाचाः Google ने हटवले हे ८ अ‍ॅप्स ट्रेंड मायक्रोच्या रिपोर्टनुसार, Ethereum (ETH) - Pool Mining Cloud अशा ८ अ‍ॅप्स पैकी एक आहे, जे यूजर्सला जाहिरात पाहण्यासाठी पैसे मिळतील, असा दावा करत असे. सोबतच, हे अ‍ॅप्स मित्रांना डाउनलोड करण्यास सांगून पैसे देण्याचा दावा करत असे. क्रिप्टोकरेंसी पेमेंट देण्याचा दावा केला जात असे. सिक्योरिटी फर्मने यूजर्सला अशा अ‍ॅप्सपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे व त्वरित अनइंस्टॉल करण्यास सांगितले आहे. असे ओळख बनावट अ‍ॅप्स
  • तुम्हाला जर इंटरनेटच्या जगात सावध राहायचे असेल तर प्ले स्टोरवरून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना काळजी घ्यायला हवी.
  • अ‍ॅप डाउनलोड करण्याआधी त्याचे रिव्ह्यू वाचायला हवे. जर एखाद्या अ‍ॅपला खूपच कमी रेटिंग असेल तर ते अ‍ॅप डाउनलोड करण्याआधी विचार करा.
  • चेक केल्यानंतर एखादा क्रिप्टोकरेंसीबाबत एड्रेस टाका. यावरून हे अ‍ॅप बनावट आहे की खरे आहे याची माहिती मिळेल.
  • जर अ‍ॅप ट्रांसफर फी मागत असेल तर अशा अ‍ॅप्सपासून सावध राहायला हवे. शक्य झाल्यास असे अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळावे.
वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ty7GNz