नवी दिल्ली : जर स्मार्टफोनची बॅटरी खराब झाली तर फोन वापरणे खूप कठीण होते. जर तुम्ही सुद्धा स्मार्टफोनच्या बॅटरीने त्रस्त असाल आणि तुम्हाला मजबूत बॅटरी असलेला फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे अनेक चांगले पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला ६,००० mAh बॅटरी असलेल्या काही जबरदस्त फोनबद्दल सांगत आहोत ज्यांची किंमत १३ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. वाचा: Realme Narzo 30A यात मीडियाटेक हेलियो जी ८५ चिपसेट सपोर्ट असून हा फोन Android १० आधारित Realme UI वर काम करतो. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. पहिला १३ MP प्राथमिक सेन्सर आणि दुसरा मोनोक्रोम लेन्स आहे. तसेच, ८ MP सेल्फी कॅमेरा फोनच्या पुढील बाजूस देण्यात आला असून फोन ६००० mAh ची बॅटरी १८ W फास्ट चार्जिंग तसेच रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची किंमत किंमत ८,९९९ रुपये आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला असून ५३ इंच FHD+ डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड १० आधारित MIUI १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात पहिला ४८ MP प्रायमरी सेंसर, दुसरा २ MP डेप्थ सेन्सर आणि तिसरा २ MP मॅक्रो लेन्स आहे. तसेच फोनच्या समोर ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.फोनमध्ये ६,००० mAh ची बॅटरी आहे. जी, १८ W फास्ट चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. याची किंमत ११,४९९ रुपये आहे. फोन ९ इंच FHD+ डिस्प्ले आणि स्लीक साइड फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्टसह येतो. यात ऑक्टा-कोर हेलिओ जी 85 एक ऑक्टाकोर प्रोसेसर सपोर्ट असून क्वाड कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोनमध्ये ७००० mAh ची बॅटरी देण्यात आली असून फोनची किंमत १०,४९९ रुपये आहे. Xiaomi या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेटआणि ६.५ इंच FHD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. मुख्य कॅमेरा ५० MP असेल. याशिवाय, ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी डेप्थ सेन्सर सपोर्ट केले गेले आहेत. सेल्फीसाठी ८ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित MIUI 5 वर चालेल. स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी देण्यात आली असून फोनची किंमत १२,४९९ रुपये. Samsung Galaxy F22 यात ४ इंच एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ४८ एमपी मुख्य कॅमेर ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल, २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी देण्यात आली असून फोनची किंमत ११,१४९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BV5oLp