Full Width(True/False)

८ इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सोबत येतोय Moto Tab 8, सॅमसंग - रियलमीला देणार टक्कर

नवी दिल्लीः मोटोरोला भारतीय बाजारात एक नवीन टॅबलेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने एक नवीन टीझर जारी केले आहे. जे कन्फर्म करतो. टॅबलेटला फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल () दरम्यान आणले जावू शकते. यावरून अंदाज लावला जावू शकतो की, डिव्हाइस लवकरच लाँच करणार आहे. टीझर मधून हेही उघड झाले की, मोटोरोलाच्या या टॅबलेटचे नाव असेल. यावरून अंदाज लावला जात आहे की, लेनोवा टॅबलेटचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. Moto Tab 8 चे संभावित फीचर्स फ्लिपकार्टच्या प्रमोशनल पोस्टरमध्ये टॅबलेटला सिंगल कॅमेरासोबत व्हाइट रियर पॅनेलमध्ये पाहिले गेले आहे. 91मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, मोटो टॅब ८ मध्ये स्टॉक अँड्रॉयड एक्सपीरियन्स मिळणार आहे. यात जवळपास सर्वच स्पेसिफिकेशंस Lenovo Tab M8 सारखे असू शकतात. यात ८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जावू शकतो. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन (1200 x 1920 पिक्सल्स) सोबत येईल. टॅबलेट मध्ये 5,100mAh ची मोठी बॅटरी दिली जाणार आहे. मोटोरोलाच्या टॅबलेट मध्ये एकूण दोन कॅमेरे असतील. एक फ्रंट मध्ये आणि एक रियर मध्ये. यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाणार आहे. हे दोन व्हेरियंट २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज मध्ये येईल. यात मीडियाटेक हीलियो P22T प्रोसेसर दिला जाणार आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट सुद्धा दिले जाणार आहे. काय आहे किंमत Moto Tab 8 च्या लाँचिंग सोबत मोटोरोला भारतीय टॅबलेट बाजारात पुनरागमन करीत आहे. भारतात याची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. कंपनीने भारतात शेवटी २०१७ मध्ये आपला Moto Tab लाँच केला होता. याला ग्राहकांकडून खास रिस्पॉन्स मिळाला नव्हता. याची टक्कर Samsung Galaxy Tab A7 आणि Realme Pad सारख्या अँड्रॉयड टॅबलेट सोबत होईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39iT0bN