Full Width(True/False)

शाओमीचे हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतात येताहेत, १०८ MP कॅमेरा आणि १२० वॉट फास्ट चार्जिंग मिळणार

नवी दिल्लीः सीरीजची उत्सुकता लागलेल्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीने या सीरीज अंतर्गत गेल्या आठवड्यात यूरोप मध्ये 11T आणि 11T Pro स्मार्टफोन्सला लाँच केले होते. आता अशी बातमी येत आहे की, कंपनी ही सीरीज भारतात सुद्धा एन्ट्री करणार आहे. टिप्स्टर मुकुल शर्मा यांच्या माहितीनुसार, शाओमीचे हे दोन्ही स्मार्टफोन भारतात ऑक्टोबर मध्ये लाँच केले जावू शकतात. 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 1080x2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. पंच होल डिझाइन आणि स्लिम बेजल्सच्या या फोनमध्ये HDR10+ सपोर्ट सोबत 120Hz चे अडेप्टिव रिफ्रेश रेट दिले आहे. स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिले दोन्ही फोनमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी 11 T प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ आणि 11T मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १२०० अल्ट्रा चिपसेट ऑफर करीत आहे. ओएस म्हणून या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड MIUI 12.5 वर काम करतो. १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन्समध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करणार आहे. १२० वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट या स्मार्टफोनमध्ये कंपनी 5000mAh ची बॅटरी ऑफर करणार आहे. 11T मध्ये तुम्हाला ६७ वॉट आणि 11T प्रो मध्ये १२० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. यूरोपमध्ये 11T 499 यूरो म्हणजेच जवळपास ४३ हजार रुपये आणि 11T प्रो 649 यूरो म्हणजेच जवळपास ५६ हजार रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहेत. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZiGaZe