Full Width(True/False)

Reliance Jio च्या या रिचार्ज प्लानमध्ये फ्री मिळतोय १० जीबी पर्यंत डेटा, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () ने काही दिवसांपूर्वी आपले काही नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केले आहे. हे प्लान लेटेस्ट Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शन सोबत येतात. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन, रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच अनेक बेनिफिट्स मिळते. या प्लानच्या लाँचिंग नंतर रिलायन्स जिओने यात एक्स्ट्रा डेटा देणे सुरू केले आहे. हा डेटा कोणत्याही चार्ज शिवाय मिळतो. प्लानमध्ये १० जीबी पर्यंत एक्स्ट्रा डेटा दिला जातो. जिओच्या ४९९ रुपये, ८८८ रुपये आणि २५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अतिरिक्त डेटाचा फायदा मिळतो. जाणून घ्या या प्लानसंबंधी. ८८८ रुपयाच्या प्लानमध्ये ५ जीबी एक्स्ट्रा सोबत एकूण १७३ जीबी डेटा रिलायन्स जिओचा ८८८ रुपयाच्या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, या प्लानमध्ये ५ जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण १७३ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. रोज १०० एसएमएस सोबत प्लानमध्ये फ्री मध्ये एक वर्षापर्यंत Disney+ Hotstar Mobile चे सब्सक्रिप्शन मिळते. सोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. २५९९ रुपयाच्या प्लानमध्ये १० जीबी एक्स्ट्रा सोबत ७४० जीबी डेटा रिलायन्स जिओचा २५९९ रुपयाच्या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, प्लानमध्ये १० जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये वर्षभरासाठी Disney+ Hotstar Mobile चे सब्सक्रिप्शन मिळते. प्लानमध्ये रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AiyKmd