नवी दिल्लीः वोडाफोन आयडिया युजर्संमध्ये जरी जिओ आणि एअरटेलच्या मागे असले तरी कंपनीकडे असे अनेक प्रीपेड प्लान आहेत. जे आपण टाळू शकत नाहीत. वोडाफोन आयडियाचे काही प्लान असे आहेत त्याच्या तुलनेत जिओचे प्लान मागे पडतात. आज आम्ही तुम्हाला च्या अशाच काही प्रीपेड प्लान संबंधी माहिती सांगणार आहोत. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज ३ जीबी डेटा मिळतो. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अतिरिक्त बेनिफिट्स मिळतात. Vodafone idea चा ९०१ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयाचा प्लान रोज ३ जीबी सोबत येतो. सोबत या प्लानमध्ये ४८ जीबी अतिरिक्त डेटा सुद्धा मिळतो. प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. याप्रमाणे एकूण ३०० जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० एसएमएस दिले जाते. तसेच वोडाफोन आयडिया प्लानमध्ये वर्षभरासाठी Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन मिळते. कंपनी रात्री १२ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत फ्री डेटा, विकेंड डेटा रोलओवर, Vi Movies & TV VIP चे अॅक्सेस सारखी सुविधा मिळते. जिओचा अशाच सुविधेचा प्लान रिलायन्स जिओ या सुविधेसोबत ९९ रुपयाचा प्लान ऑफर करते. जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. याप्रमाणे एकूण डेटा २५२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, ग्राहकांना यात जिओ अॅप्स (JioTV, JioCinema, Jionews, JioSecurity, JioCloud) चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. कोणत्या प्लानमध्ये जास्त फायदा वोडाफोन आयडियाचा प्लान रिलायन्स जिओच्या प्लान पेक्षा स्वस्त आहे. जिओ प्लान १०० रुपयांपेक्षा महाग आहे. वोडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये ४८ जीबी जास्त डेटा, रात्री फ्री डेटा आणि विकेंड रोलओवर डेटा सारखी सुविधा मिळते. सोबत वोडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये एक वर्षापर्यंत Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kb8yVf