Full Width(True/False)

स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: Vivoचा स्मार्टफोन खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर सुमारे १० स्मार्टफोन प्रचंड सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून या स्मार्टफोनच्या खरेदीवर जास्तीत जास्त ५,००० रुपयांची सूट आणि १२ महिने नो-कॉस्ट ईएमआय सारखे ऑफर्स देण्यात येत आहे. वाचा: ३२ MP सुपर नाईट सेल्फी कॅमेरा आणि ४४ W फ्लॅश चार्जरसह V21e 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर २,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. हा फोन २४,९९० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. Vivo V21 5G हा ४४ MP OIS फ्रंट कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन होता. ज्याची किंमत २९,९९० रुपये आहे. मात्र, फोन खरेदीवर २,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. सीरीजच्या स्मार्टफोनवर ५,००० रुपयांची सर्वाधिक एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनची किंमत ३४,९९० रुपये आहे. फोन स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि गिंबल स्थिरीकरण २.० समर्थनासह येईल. Vivo Y1s स्मार्टफोनमध्ये ४०३० mAh ची बॅटरी आहे. हा फोन ९,४९० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ३ महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायावर तुम्ही फोन ९,४९० रुपयांना खरेदी करू शकाल. Vivo Y73 स्मार्टफोनची किंमत २०,९९० रुपये असून हा फोन ६४ MP नाईट कॅमेरा सह येतो. या फोनच्या खरेदीवर १,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तर, Vivo Y53s स्मार्टफोनची किंमत १९,४९० रुपये असून हा फोन ८GB रॅम आणि ३GB विस्तारित रॅम सपोर्टसह येतो. फोनच्या खरेदीवर १, ५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. Vivo Y20 मालिकेचा स्मार्टफोन ११,४९० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून हा फोन साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. Vivo Y72 स्मार्टफोन ८GB रॅम आणि ४GB विस्तारित रॅम सपोर्टसह येईल. हा फोन २०,९९० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. फोन खरेदीवर १,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तर, Vivo Y12s स्मार्टफोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. फोनची किंमत १०, ४९० रुपये आहे. फोन खरेदीवर ५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. Vivo Y51A स्मार्टफोनची किंमत १६,९९० रुपये असून या फोन खरेदीवर १००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. हा फोन ४८ MP रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lMJEKY