Full Width(True/False)

WhatsApp युजर्ससाठी बॅड न्युज !कंपनीने काढून टाकले 'हे' फीचर, चॅट्सवर कसा परिणाम होणार? पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : आपले App अधिक युजर फ्रेंडली बनवण्यासाठी नवीन फीचर जोडत असते आणि म्हणूनच App वापरणाऱ्यांची संख्या खूप आहे. अलीकडेच, कंपनीने नॉन-बीटा युजर्ससाठी मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचर उपलब्ध केले आहे. परंतु, WABetaInfo च्या अहवालानुसार, इन्स्टंट मेसेजिंग अॅपने आता त्याचे एक प्रसिद्ध वैशिष्ट्य काढून टाकले आहे, जे कंपनीने एक वर्षापूर्वी जोडले होते. हे फीचर दुसरे- तिसरे नसून WhatsApp Messenger Rooms Shortcut आहे. वाचा: अहवालानुसार, “एक वर्षापेक्षा जास्त काळापूर्वी, व्हॉट्सअॅपने मेसेंजर रुम्स तयार करण्यासाठी एक उपयुक्त शॉर्टकट जारी केला, ज्यामुळे ५० सहभागींना फेसबुकवरील ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होण्यापरमिशन मिळायची. पण ,आता WhatsApp हा पर्याय Android आणि IOS साठी WhatsApp बीटावरील चॅट शेअर शीट आणि कॉल सेक्शनमधून काढून टाकत आहे. हे वैशिष्ट्य इंस्टाग्रामवर आणण्यात आले आणि नंतर ते व्हॉट्सअॅपसाठीही प्रसिद्ध करण्यात आले. या फीचरमुळे, व्हॉट्सअॅपचे अँड्रॉइड युजर्स व्हॉट्सअॅपद्वारेच रूम तयार करू किंवा सामील होऊ शकले. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की , युजर्स कोणत्या फीचर्सचा उपयोग करतात हे WhatsApp द्वारे व्हेरिफाय केले जाते. जर वैशिष्ट्य यशस्वी झाले नाही, तर, रिफाईन केले जातात. काय आहे व्हॉट्सअॅप मेसेंजर रूम वैशिष्ट्य ? व्हॉट्सअॅप मेसेंजर रूम शॉर्टकट प्रथम मे २०२० मध्ये सादर करण्यात आले होते . एका अहवालानुसार, iOS २.२१.१९०.११ साठी WhatsApp बीटा आणि Android २.२१.१९.१५ साठी WhatsApp बीटा ही दोन बीटा आवृत्त्या आहेत. ज्यावर, व्हॉट्सअॅपने अनुक्रमे iOS आणि Android साठी शेअरिंग वर्ककपेसिटीला डिसेबल केले आहे. अलीकडेच, कंपनीने एक विशेष वैशिष्ट्य सादर केले ज्याद्वारे युजर्स आता iOS वरून Android वर चॅट ट्रान्सफर करू शकतील. व्हॉट्सअॅपने अधिकृतपणे हे चॅट मायग्रेशन फीचर जारी केले आहे. सध्या सॅमसंगच्या स्मार्टफोनसाठी व्हॉट्सअॅपने हे फीचर सादर केले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात गॅलेक्सी अनपॅक इव्हेंट दरम्यान हे चॅट मायग्रेशन वैशिष्ट्य जारी केले होते, परंतु त्या वेळी हे वैशिष्ट्य केवळ फोल्डेबल फोनसाठी जारी करण्यात आले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kqeMR3