Full Width(True/False)

नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेताय? त्याआधी जाणून घ्या Wired आणि Wireless Router मधील फरक

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे कनेक्टिव्हिटीची मागणी वाढली आहे. घरूनच काम करावे लागत असल्याने लोक घेत आहोत. कनेक्शन घेताना वायर्ड कनेक्शन आणि वायरलेस कनेक्शन असे दोन पर्याय असतात. मात्र, वायर्ड कनेक्शन आणि वायरलेस कनेक्शनमधील अंतर तुम्हाला माहिती आहे का? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. वाचा: वायर्ड कनेक्शनमध्ये बहुतांश वेळा डिव्हाइसला अथवा मॉडेमशी कनेक्ट करण्यासाठी Ethernet केबल्सचा उपयोग केला जातो. तुम्ही आवश्यक हार्डवेअरसह होम फोन लाइन सिस्टमचा देखील वापर करू शकता. राउटर्स दोन प्रकारचे असतात – वायर्ड आणि वायरलेस राउटर. हे कनेक्शनसाठी खूपच महत्त्वाचे असते. काय आहे? वायरलेस राउटर थेट मॉडेम अथवा केबलशी कनेक्ट असते. हे तुम्हाला इंटरनेटचा वापर करण्याची सुविधा देते. हे राउटर इन-बिल्ट एंटेनाचा वापर करते, जे वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट होते. यामुळे तुमच्या होम नेटवर्कवर सर्व डिव्हाइससाठी इंटरनेट वायरलेस पद्धतीने उपलब्ध होते. काय आहे? वायर्ड राउटर हे थेट वायर्ड लिंकवर डिव्हाइसशी कनेक्ट होते. यात तुम्हाला एक पोर्ट मिळेल, जे मॉडेमशी जोडण्यासाठी इंटरनेटशी लिंक होईल. पोर्टच्या माध्यमातून वायर्ड राउटर हे कॉम्प्युटरसह अन्य डिव्हाइसशी देखील कनेक्ट होईल. Wired आणि Wireless Routers मध्ये फरक काय?
  • इंटरनेट स्पीडच्याबाबतीत वायर्ड राउटर हा चांगला पर्याय ठरतो.
  • बहुतांश वायर्ड नेटवर्क कनेक्शन १० ते १०० एमबीपीएस बँडविथ प्रदान करतात. तर वायरलेस कनेक्शन कमी बँडविथ प्रदान करते.
  • वायर्ड राउटरला विश्वसनीय कनेक्शन म्हटले जाऊ शकते. कारण, यात लाइन थेट राउटरमध्ये जोडलेली असते.
  • दुसरीकडे, तुम्ही अ‍ॅक्सेस प्वाइंटपासून लांब गेल्यावर वायरलेस कनेक्शन उपयोगी ठरत नाही.
  • विश्वसनीय असले तरीही वायर्ड नेटवर्क इंस्टॉल करणे आणि री-कॉन्फिगर करण्यास महाग आहे. तर वायरलेस नेटवर्कमध्ये यूजर्स कोणत्याही डिव्हाइसला ट्रांसफर करता येत नाही.
दोन्हींच्या तुलनेत वायर्ड नेटवर्क हे वायरलेस नेटवर्कच्या तुलनेत फास्ट असते. कारण, यात प्रत्येक डिव्हाइसला जोडण्यासाठी वेगवेगळ्या केबलचा उपयोग केला जातो व प्रत्येक केबल समान डेटा ट्रांसमिट करते. वायरलेस नेटवर्क देखील फास्ट असतात, मात्र याचा स्पीड डिव्हाइसचे रुटिंग, पोर्ट व हार्डवेअरवर अवलंबून असते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CvFZrY