नवी दिल्ली: एकापेक्षा एक स्मार्टफोनद्वारे युजर्समध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविणारी चीनची कंपनी Xiaomi १५ सप्टेंबर रोजी इव्हेन्ट आयोजित करणार असून बातमीनुसार, कंपनी या जागतिक लाँच इव्हेंटमध्ये Xiaomi Mi 11T सीरीजसह Xiaomi ची आणखी काही प्रोडक्टस लाँच करणार आहे. यात Xiaomi Mi 11 T सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन सादर केले जातील. ज्यात, एक व्हॅनिला आणि दुसरा प्रो मॉडेल असेल. ज्याची बॅटरी केवळ आठ मिनिटांत पूर्ण चार्ज होईल पाहा डिटेल. वाचा: विशेष तंत्रज्ञानाचा वापर शाओमीने Mi 11T Pro चा टीझर रिलीज केला आहे, ज्यात हे उघड झाले आहे की, हा स्मार्टफोन १२० W हायपरचार्ज तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, म्हणजेच त्याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास केवळ काही मिनिटे लागतील. ८ मिनिटात फोन होणार चार्ज शाओमीच्या मते, ४००० mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन १२० W हायपरचार्ज तंत्रज्ञानाद्वारे अवघ्या आठ मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. त्यात स्नॅपड्रॅगन ८८८ SoC प्रोसेसर वापरला जाऊ शकतो. तसेच, फोनमध्ये OLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट १२० Hz असेल. कॅमेरा Xiaomi Mi 11 T Pro स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा असू शकतो. फ्रंट कॅमेऱ्याबाबत मात्र, सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Realme 8s 5G सोबत असेल स्पर्धा Xiaomi Mi 11 T Pro स्मार्टफोन भारतात Realme 8s 5G सोबत स्पर्धा करेल. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट ९० Hz असेल. हा फोन MediaTekIndia Dimensity ८१० 5G चिपसेट सह लाँच होणारा पहिला फोन असेल. यात ८ GB रॅम आणि २५६ GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी, यात ट्रिपर रिअर कॅमेरा असेल ज्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सल आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात असू शकतो. पॉवरसाठी फोन मध्ये ५००० mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DYReL1