Full Width(True/False)

मुलांची नावं शोधण्यात रणवीर सिंग बिझी, म्हणे- मुलगी हवी!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, भविष्यात होणाऱ्या मुलांची नावे शॉर्टलिस्ट करण्याचे काम सुरू केले आहे. 'द बिग पिक्चर' या शोच्या माध्यमातून रणवीरने टीव्हीवर डेब्यू केले. या शोच्या नवीन प्रोमोमध्ये रणवीर लग्न व भविष्यात मुलांविषयी बोलताना दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये रणवीरने हसताना म्हटले की, 'जसे की तुम्ही सर्वजण जाणता माझे लग्न झाले आहे आणि आता दोन- तीन वर्षांत मुलेही होतील. भाऊ, तुमची वहिनी लहानपणी इतकी क्यूट होती ना, मी तर दररोज तिच्या लहानपणीचे फोटो पाहत असतो आणि म्हणतो मला एक अशीच मुलगी दे, माझे जीवन सफल होईल.' रणवीरने केला ' ततड ततड ' वर डान्स रणवीर या व्हिडिओच्या सुरुवातीला स्पर्धकसोबत त्याचे प्रसिद्ध गाणे 'ततड ततड' वर डान्स करताना दिसतो. त्यानंतर स्पर्धकाची ओळख करून देताना रणवीर म्हणतो की, 'कृपया लक्ष द्या. त्यांचा स्वॅग भयंकर आहे आणि त्यांच्या स्टाईलची चर्चा शहरभर होते. स्वागत करा गोरखपूर, उत्तर प्रदेशच्या अभय सिंह यांचे.' बॉलिवूडमधील आयडल कपल दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये इटली येथील माकमा लेक येथे डेस्टिनेशन वेडिंग केले. रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील आयडल कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांमध्ये खूप छान बाँडिंग आहे. सोशल मीडियावर आणि व्यक्तिगत आयुष्यातही हे दोघे एकमेकांवरील प्रेम जाहीर करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रणवीर आणि दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे तर या दोघांचा '८३' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. यासिनेमाबद्दल त्यांच्या इतकीच चाहत्यांनाही उत्सुकता आहे. भारताने १९८३ मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपवर हा सिनेमा आधारीत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j6O0Mn