Full Width(True/False)

Redmi च्या नवीन Smart TV मध्ये मिळेल हे खास फीचर, २० ऑक्टोबर रोजी लाँचिंग

नवी दिल्लीः Xiaomi आपल्या सब ब्रँड रेडमीची नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनी नवीन मॉडल्सच्या स्मार्ट टीव्हीचा २० ऑक्टोबर रोजी पडदा हटणार आहे. या टीव्हीची एन्ट्री सर्वात आधी चीनच्या बाजारात होणार आहे. भारतात रेडमीच्या या नवीन स्मार्ट टीव्ही सीरीजची लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन टीव्ही सीरीजच्या लाँचिंग आदी कंपनीने टीझर इमेज शेयर करून सांगितले होते की, या सीरीज मध्ये 120Hz चा रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळणार आहे. तीन स्क्रीन साइजमध्ये येतील नवीन टीव्ही रेडमीच्या या अपकमिंग स्मार्ट टीव्ही सीरीज संबंधी अजून जास्त माहिती समोर आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, हे नवीन टीव्ही ५५ इंच, ५५ इंच, आणि ६५ इंचाच्या साइजमध्ये येतील. कंपनीच्या जुन्या स्मार्ट टीव्ही सीरीज मध्ये कंपनीने लाँच केले होते. २०२० मॉडलचे अपग्रेडेड वर्जन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये रेडमी स्मार्ट टीव्ही X 2022 मध्ये कंपनी HDR10+ सपोर्ट सुद्धा ऑफर करू शकते. असे मानले जात आहे की, नवीन सीरीजला कंपनी स्मार्ट टीव्ही X 2020 ला अपग्रेडेड व्हर्जन म्हणून लाँच करू शकते. नवीन सीरीज टीव्हीत २०२० मॉडलचे काही फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज नवीन सीरीजच्या टीव्हीत डीटीएस वर्चुअल X, डॉल्बी ऑडियो, डॉल्बी विजन आणि MEMC दिले जाणार आहेत. नवीन टीव्हीत २ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज सोबत येवू शकते. नवीन सीरीज टीव्हीची किंमती संबंधी अद्याप काही म्हटले जावू शकत नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lS05am