Full Width(True/False)

आता फक्त ६,४९९ रुपये खर्च करून जुन्या टीव्हीला बनवा नवा Smart 4K TV, घरात मिळेल थिएटर सारखी मजा

नवी दिल्लीः Amazon ने गेल्या महिन्यात भारतात आपली फ्लॅगशीप स्ट्रिमिंग डिव्हाइस फायर टीव्ही स्टिक 4K मॅक्स लाँच केली होती. नवीन डिव्हाइसला आता थेट Amazon India द्वारे खरेदी करू शकता. नवीन मॅक्स व्हेरियंट अनेक नवीन सुविधा देते. फायर टीव्ही स्टिक 4K च्या तुलनेत जवळपास ४० टक्के वेगवान आहे. हे 4K व्हिडिओ स्ट्रिमिंगसाठी डॉल्बी एटमॉस, डॉल्बी व्हिजन आणि अन्य टेक्नोलॉजीच्या टीव्हीसाठी खास आहे. मॅक्समध्ये वाय फाय ६ सारखे नवीन कनेक्टिविटी पर्याय सोबत येते. ची किंमत भारतात अमेझॉन फायर टीव्ही स्टिक 4K मॅक्सची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. याला तुम्ही अमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. यासोबतच काही ऑफलाइन अमेझॉन कियोस्कवरून खरेदी करू शकाल. सध्या प्रोडक्टवर कोणतीही सूट उपलब्ध नाही. 4K Max चे फीचर्स नवीन फायर टीव्ही स्टिक 4K मॅक्स 4K स्ट्रीमिंग स्टिकच्या तुलनेत ४० टक्के वेग आहे. ही एक MT8696 क्वाड-कोर चिपसेटचा वापर करते. 2GB रॅम सोबत येते. यात युजर सहज इंटरफेस, वेगाने अॅप लाँच मध्ये मदत करते. डिव्हाइस HDR10+, Dolby Vision आणि Dolby Atmos ला सपोर्ट करतो. याचाच अर्थ या सर्व सुविधेचा टीव्ही असेल तर तुम्ही या सर्व टेक्नोलॉजीचा बेस्ट 4K स्ट्रीमिंग अनुभवासाठी वापर करू शकता. अलेक्साच्या माध्यमातून व्हाइस कमांडचे समर्थन करते. रिमोट मध्ये प्राइम व्हिडिओ, प्राइम म्यूझिक आणि नेटफ्लिक्ससाठी क्विक बटन दिले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uRF5Di