नवी दिल्लीः भारतात सध्या अजून लाइव्ह कमर्शियल 5G नेटवर्क्स चे रोलआउट होणे बाकी आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने आधीच 6G टेक्नोलॉजीवर फोकस करणे सुरू केले आहे. केंद्र सरकारने 6G टेक्नोलॉजी साठी मोठी तयारी केली आहे. इकनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशंस (DoT) ने 6G (सिक्स्थ जनरेशन) टेक्नोलॉजी वर फोकस करण्यासाठी एक टेक्नोलॉजी इनोवेशन ग्रुप बनवला आहे. टेक्नोलॉजी इनोवेशन ग्रुपचा यावर राहणार फोकस टेलिकॉ सेक्रेटरी के राजारमन अध्यक्ष म्हणून या टेक्नोलॉजी इनोवेशन ग्रुपचे नेतृत्व करणार आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, हा फोरम, 6G टेक्नोलॉजीसाठी व्हिजन आणि ऑब्जेक्टिव्स तयार करण्याचे काम करणार आहे. सोबत 6G टेक्नोलॉजीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) चा रोड मॅप डेव्हलप करणार आहे. याशिवाय, हा ग्रुप 6G साठी प्री स्टँडर्डायजेशन, अॅप्लिकेशन्स आणि प्रोडक्ट्स डेव्हलपमेंटची रुपरेषा तयार करणार आहे. हुवावे, सॅमसंग आणि LG ने आधीच 6G वर काम करणे सुरू केले इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, डिपार्टमेंटचा १ नोव्हेंबर तारखेला मेमरँडम म्हटले गेले आहे. भारतात ६ जी स्पेस मध्ये करण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी सरकार, इंडस्ट्री आणि टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर्सकडून मदतीचा प्रयत्न करण्याची गरज आहे. या टेक्नोलॉजी इनोव्हेशन ग्रुप मध्ये २२ सदस्यांचा समावेश आहे. डिपार्टमेंटने टेलिकॉम सेक्रेटरीला आवश्यकतेनुसार, कमेटीत आणखी लोकांचा समावेश करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. चीनची हुवावे, दक्षिण कोरियाची सॅमसंग, आणि LG आधीच 6G टेक्नोलॉजी वर काम करणे सुरू केले आहे. 6G टेक्नोलॉजी 5G च्या तुलनेत खूप जास्त असणार आहे. ही टेक्नोलॉजी आल्यानंतर खूप मोठा बदल पाहायला मिळू शकतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GWB1av