नवी दिल्ली : देश आणि जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांनी डिव्हाइसला अधिक लोकप्रिय बनविण्यासाठी काही बदल केले आहे. मात्र काही अशा गोष्टी देखील आहेत ज्या योग्य नाहीत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेक चुका करतात. अशाच स्मार्टफोन कंपन्यांनी केलेल्या ५ चुकांबाबत जाणून घेऊया. वाचा: चुकीची मार्केटिंग अनेक स्मार्टफोन कंपन्या प्रोडक्ट्सला चांगले दाखविण्यासाठी चुकीची मार्केटिंग करतात. मात्र, अखेर सर्वकाही समोर येतेच. याची सुरुवात Lumia 920 सोबत झाली. यात DSLR द्वारे शूट केलेला व्हिडिओ दिसत होता. याच प्रमाणे ने देखील Nova 3 स्मार्टफोनसाठी DSLR शॉट्सचा उपयोग केला होता. स्मार्टफोनमध्ये जाहिराती याबाबतीत सर्वात पुढे आहे. कंपनीन Xiaomi Redmi Note सीरिज स्मार्टफोनमध्ये जाहिराती दिल्या आहे. या जाहिरातींमुळे मोठी समस्या निर्माण होते. स्मार्टफोनमधील बहुतांशी फ्री अ‍ॅप जाहिरातीसह येतात. त्यामुळे फोन वापरतानाच अनुभव वाईट असतो. रियलमी आणि सॅमसंगने देखील फोनमध्ये जाहिराती सुरू केल्या आहेत. हेडफोन जॅकला हटवले याची तक्रार आता करता येणार नाही, कारण काही वर्षांपूर्वीच iPhone 7 मधील हेडफोन जॅकला हटवण्यात आले होते. Apple ने आयफोनमध्ये नाविन्यपूर्ण करण्यासाठी हे केले होते. मात्र, यामुळे अनेकजण खुष नव्हते. आताही अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोनम्ये वॉटर रेसिस्टेंट आणि वायरलेस ऑडिओ टेक्नोलॉजीमुळे हेडफोन जॅक मिळत नाही. चीटिंग बेंचमार्क काही दिवसांपूर्वी Realme ने Realme GT फोनसाठी एंटुटु बेंचमार्क स्कोरमध्ये बदल केला होता. यामुळे फोनला ३ महिन्यांसाठी प्लॅटफॉर्मवरून बॅन केले होते. मात्र, Realme असे करणारी पहिली कंपनी नाही. OnePlus, Huawei, Honor, OPPO आणि Samsung सारख्या कंपन्यांवर देखील बेंचमार्क स्कोरमध्ये हेरफेर केल्याचे आरोप झाले आहेत. काही कंपन्या नवीन स्मार्टफोनवर बेंचमार्क अ‍ॅप्सला ब्लॉक देखील करतात. लाँचनंतर बंपर डिस्काउंट भारतातील सर्व स्मार्टफोन यूजर्सला माहितीये की, लाँचनंतर अँड्राइड फोनवर बंपर डिस्काउंट मिळते. आपल्या गॅलेक्सी स्मार्टफोन सीरिजसाठी नेहमी असे करते. मात्र, यामुळे लाँचच्या दिवशीच फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे यामुळे थोडेफार नुकसान होते. अँड्राइड स्मार्टफोनची किंमत आयफोनच्या तुलनेत लवकर कमी होते. त्यामुळे अँड्राइड स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर काही दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून जास्त डिस्काउंट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZSVe0p