नवी दिल्ली : स्मार्टफोनप्रमाणेच आता देखील महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. लॅपटॉपचा उपयोग ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या क्लासेससाठी होतो. बाजारात उपलब्ध असलेल्या ४० हजार रुपयांच्या बजेटमधील अशाच काही सर्वोत्तम लॅपटॉपविषयी जाणून घेऊया. वाचा: Intel i3 Asus VivoBook 14 Intel i3 ची किंमत ३९,९९० रुपये आहे. यामध्ये इंटेल ११ th जनरेशन i३-१११५G४ प्रोसेसर दिला आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी NVMe PCIe SSD स्टोरेज मिळते. लॅपटॉपमध्ये १४ इंच FHD LCD स्क्रीन दिली आहे. IdeaPad Slim 3 Lenovo IdeaPad Slim 3 ची किंमत ३७,९९० रुपये आहे. यामध्ये १० th जनरेशन इंटेल आय३ प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. यामध्ये १४ इंच FHD डिस्प्ले मिळतो. E-Learning Edition या लॅपटॉपमध्ये ११ th जनरेशन इंटेल कोर आय३ प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी PCIe NVMe SSD स्टोरेज मिळते. याची किंमती जवळपास ४० हजार रुपये आहे. Aspire 5 Acer Aspire 5 ची किंमत ३६,९९० रुपये आहे. यामध्ये १४ इंच डिस्प्ले दिला आहे. यात इंटेल कोर आय३ प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी PCIe NVMe SSD स्टोरेज मिळते. 15 Ryzen 3 या लॅपटॉपची किंमत ३८,९९० रुपये असून, यामध्ये AMD Ryzen ३ ३२५०U चिप, १५.६ इंच डिस्प्ले, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. Dell Vostro 3401 डेलच्या या लॅपटॉपमध्ये इंटेल ११ th जनरेशन कोर आय३ प्रोसेसर दिला आहे. ८ जीबी रॅम आणि १ टीबी HDD सह येणाऱ्या या लॅपटॉपची किंमत ३९,६३९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kbgkOj