मुंबई- '' या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. अनिरुद्ध, अरुंधती आणि संजना यांच्या आसपास फिरणाऱ्या या मालिकेत आता आणखी एका महत्वाच्या व्यक्तीची एण्ट्री होणार आहे. अरुंधतीचा मित्र आशुतोष केळकर याचं कॉलेजमध्ये अरुंधतीवर प्रेम होतं. आता पुन्हा एकदा ते दोघे समोरासमोर येणार. या भेटीचा नक्की काय परिणाम होणार? प्रेक्षकांना याचा अंदाज आला नसला तरी अनिरुद्धची भूमिका साकारणारे यांना ते नक्कीच कळालं आहे. एका पोस्टमधून मिलिंद यांनी अनिरुद्धच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मिलिंद यांनी पोस्ट करत लिहिलं, 'काही माणसं आयुष्याच्या अशा वळणावर भेटतात ज्यावेळेला आधाराची अत्यंत गरज असते आणि तो योग्य व्यक्ती भक्कम आधार देऊ शकतो. अरुंधतीच्या आयुष्यामध्ये आशुतोष केळकर आला आहे. कॉलेजचा मित्र. कॉलेजमध्ये तिच्या प्रेमात असणारा. जसं उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, हिवाळा येतो तसं माणसाच्या आयुष्याचे ऋतूही बदलतात. अनिरुद्धच्या कर्माचे परिणाम अरुंधतीला भोगावे लागले, तिच्या आयुष्यात वाईट दिवस आले, पण वाईट दिवस फार काळ राहत नाहीत.' 'अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोष चांगले दिवस घेऊन येईल. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे असच घडत असतं. दोन वर्षाच्या करोनाच्या काळात, काही क्षणी असं वाटत होतं ही संपणारच नाही का हा करोना? आता असच जगावं लागणार का? सिनेमागृह खुली नाही होणार का? आता थिएटरमध्ये नाटकं बघायला नाही मिळणार का? लॉकडाऊन संपणारच नाही का? परवा सूर्यवंशी या सिनेमाचा ट्रेलर पाहिला. पाच तारखेला थेटर मध्ये रिलीज होतोय. हळूहळू थेटर्स सुरू होतील अशी आशा वाटते. लोकं सिनेमांना जायला लागतील.' 'असंच आई कुठे काय करते मध्ये अरुंधती पुन्हा आनंदी राहायला लागेल. आशुतोष केळकर हा तिच्यासाठी चांगले दिवस घेऊन येईल, नक्की घेऊन येईल. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं नेहमी दुसऱ्याचं भलं करतात दुसऱ्याचं चांगलं करतात. आशुतोष केळकर हा तसाच आहे. अनिरुद्ध देशमुखचा पश्चाताप, त्याच्या चुकीची जाणीव, आयुष्यात त्यांनी काय गमावलं हे आता त्याला कळायला लागणार, अनिरुद्ध देशमुखच्या आयुष्यातला लॉक डाऊन सुरू झालाय.' असं म्हणत मिलिंद यांनी आशुतोष म्हणजेच ओमकार गोवर्धन याचं मालिकेत स्वागत केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mI8zRw