नवी दिल्लीः आसुस (Asus) ने आपले लेटेस्ट फ्लॅगशीप गेमिंग स्मार्टफोन यूरोपमध्ये लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये आणि चा समावेश आहे. आसुस ने ऑगस्ट मध्ये तायवानमध्ये ROG Phone 5s सोबत ROG Phone 5s Pro लाँच केले आहे. नवीन मॉडल्स या वर्षीच्या सुरुवातीला आलेल्या ROG Phone 5 चे अपग्रेड्टस आहे. नवीन मॉडल्स क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस प्रोसेसर सोबत येतात. तर ROG Phone 5 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत आला होता. याशिवाय, नवीन मॉडल्स मध्ये १८ जीबी पर्यंत रॅम दिले आहे. इतकी आहे आसुसच्या स्मार्टफोनची किंमत Asus ROG Phone 5s ची किंमत ९९९ पाउंड म्हणजेच जवळपास १ लाख १६५ रुपये आहे. ही किंमत १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. तर, Asus ROG Phone 5s Pro ची किंमत १०९९ पाउंड म्हणजेच जवळपास १ लाख १० हार १९५ रुपये आहे. आसुसचा हा गेमिंग स्मार्टफोन १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज सोबत येतो. 6,000 mAh ची दमदार बॅटरी सोबत आले दोन्ही फोन Asus ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro दोन्ही फोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 144 Hz रिफ्रेश रेट दिला आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले 300 Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. दोन्ही स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉयड 11 OS वर बेस्ड ROG UI वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 3.5mm चा ऑडियो जॅक सुद्धा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro दोन्ही फोनमध्ये 6,000 mAh ची बॅटरी दिली आहे. जी 65W HyperCharge फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा स्मार्टफोनच्या रियर मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकमध्ये मेन कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकमध्ये मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा दिला आहे. याशिवाय, फोनच्या बॅक मध्ये १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k87IIt